शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना ‘सर्वत्र’ आरक्षण

By admin | Updated: July 5, 2016 04:23 IST

केंद्र सरकारने आपल्या नोकऱ्यांमध्ये अपंगांसाठी असलेले तीन टक्के आरक्षण केवळ वर्ग ‘क’ आणि ‘ड’मधील कनिष्ठ पदांपुरते मर्यादित न ठेवता ते वर्ग ‘अ’ आणि ‘ब’सह सर्व स्तरांवर लागू

मुंबई/दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या नोकऱ्यांमध्ये अपंगांसाठी असलेले तीन टक्के आरक्षण केवळ वर्ग ‘क’ आणि ‘ड’मधील कनिष्ठ पदांपुरते मर्यादित न ठेवता ते वर्ग ‘अ’ आणि ‘ब’सह सर्व स्तरांवर लागू करावे, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.जी पदे थेट भरतीऐवजी फक्त बढतीनेच भरली जातात, अशा पदांमध्येही अपंगांसाठी आरक्षण ठेवणे बंधनकारक आहे, असेही न्यायालयाने जाहीर केले आहे. यामुळे अपंगांच्या आरक्षणात सरकारने घातलेला खोडा दूर झाला असून, अपंग जबाबदारी पार पाडू शकतील, असे सरकारी सेवेतील कोणतेही पद त्यांच्यासाठी वर्ज्य राहणार नाही.प्रसार भारतीमधील राजीव कुमार गुप्ता व इतर अपंग कर्मचाऱ्यांनी केलेली रिट याचिका व न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीतील अरुण सिंघवी या अपंगाने केलेल्या अपिलावर न्या. जे. चेलमेश्वर व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या विषयावर न्यायालयाने याआधीही निकाल दिले असले तरी अपंगांना तीन टक्के आरक्षणाचा, कोणताही भेदभाव व निर्र्बंंधांविना,पूर्णांशाने लाभ देणारा म्हणून हा निकाल पथदर्शी म्हणावा लागेल.अपंगाना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणासह अन्य सोयीसुविधा देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने १९९५ मध्ये ‘पर्सन्स विथ डिसेबिलिटिज (इक्वल आॅपॉच्युर्निटिज, प्रोटेक्शन आॅफ राईट््स अ‍ॅण्ड फूल पार्टिसिपेशन) अ‍ॅक्ट’ हा कायदा केला. हा कायदा ‘पीडब्ल्यूडी अ‍ॅक्ट’ या संक्षिप्त नावानेही ओळखला जातो. या कायद्याच्या कलम ३३ अन्वये सरकारी नोकऱ्यांमधील किमान तीन टक्के जागा विविध प्रकारच्या शारीरिक अपंगांसाठी राखून ठेवल्या गेल्या. अपंग व्यक्ती त्याच्या अपंगत्वाच्या स्वरूपानुसार कोणत्या पदावर काम करू शकतो, हे ठरवून सरकारने अपंगांसाठी राखीव असलेली तीन टक्के आरक्षित पदे ठरवावीत, असे या कायद्याचे कलम ३२ सांगते.केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना मात्र १८ फेब्रुवारी १९९७ व २९ डिसेंबर २००५ रोजी जारी केलेल्या दोन परिपत्रकांनी मर्यादा घातल्या. अपंगांचे हे आरक्षण फक्त वर्ग ‘क’ व ‘ड’मधील कनिष्ठ पदांनाच लागू होईल आणि वर्ग ‘अ’ व ‘ब’मधील वरिष्ठ पदांमध्ये आरक्षण असणार नाहीत. तसेच जी पदे फक्त बढतीनेच भरली जातात त्यांमध्येही अपंगांसाठी राखीव जागा असणार नाहीत, असे या परित्रकांद्वारे ठरविले गेले. न्यायालयाने ही दोन्ही परिपत्रके ‘पीडब्ल्यूडी कायद्या’चे उल्लंघन करणारी व त्याच्या मूळ उद्देशास हरताळ फासणारी आहेत, असा निर्वाळा देत ती रद्द केली. न्यायालयाने म्हटले की, अपंगांना समान संधी देण्यासाठी हा कायदा केलेला असल्याने त्यांचे आरक्षण केवळ कनिष्ठ पदांपुरते मर्यादित ठेवणे म्हणजे त्यांना समान संधी नाकारणे आहे. एखाद्या पदावर अपंग काम करू शकतो, असे सरकारने ठरविल्यावर ते पद आरक्षणाच्या कक्षेत आपोआपच येते. शिवाय जी पदे फक्त बढतीनेच भरली जातात ती अपंगांना नाकारणे हा भेदभाव आहे. (विशेष प्रतिनिधी)अपंग हे दलित नव्हेतबढतीने भरायच्या पदांमध्ये अपंगांसाठी आरक्षण न ठेवण्याचे समर्थन करताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने इंदिरा सहानी प्रकरणात दिलेल्या निकालाचा दाखला दिला. त्या निकालाने बढत्यांमधील आरक्षण घटनाबाह्य ठरविले गेले होते. परंतु हा मुद्दा अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, इंदिरा सहानी प्रकरणाचा निकाल राज्यघटनेनुसार मागासवर्गीय व आदिवासींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणासंबंधी होता. तो अपंगांना लागू होत नाही. कारण अपंग हे दलित किंवा आदिवासी नाहीत. त्यांना दिले जाणारे आरक्षण ते मागासलेले आहेत म्हणून नव्हे तर त्यांच्या अपंगत्वामुळे दिले गेले आहे.अंध वकिलाने दिला न्यायया प्रकरणाची आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे एस. के. रुंगठा या अंध वकिलाने अर्जदारांच्या वतीने यशस्वीपणे युक्तिवाद करून केंद्र सरकारच्या सेवेतील तमाम अपंगांना न्याय मिळवून दिला. ‘ज्येष्ठ वकील’ म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळालेले अ‍ॅड. रुंगठा हे देशातील एकमेव अंध वकील आहेत. अंध कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हेच यावरून दिसून येते.