शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रतिष्ठेला मुकलेले श्रमाचे साथीदार

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

संदीप रोडे अहमदनगर दुष्काळाच्या स्थितीत जिरायती शेती नापीक झाली. कुटुंब मोठं असल्याने खायची पंचायत झाली. अशातच मामा भेटले. त्यांनी हमाली कामासाठी नगरला आणले.

संदीप रोडे अहमदनगरदुष्काळाच्या स्थितीत जिरायती शेती नापीक झाली. कुटुंब मोठं असल्याने खायची पंचायत झाली. अशातच मामा भेटले. त्यांनी हमाली कामासाठी नगरला आणले. ४० वर्षापासून हमाली काम करणारे उत्तम जिजाबा हल्लाळ (जामगाव,ता. पारनेर) सांगत होते. शारीरिक कष्टाचे काम केल्याशिवाय पोटाला अन्न मिळत नाही. रोजंदारीवर काम केले तर पोटभर अन्न मिळेल याची शाश्वती नाही. वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातात पाय फ्रॅक्चर झाला. पण तरीही हमाली काम हीच प्रतिष्ठा मानून ओझे वाहण्याचे काम अविरतपणे सुरू असल्याचे हल्लाळ अभिमानाने सांगत होते. मात्र ओझे वाहणाऱ्या हमालाला समाजात मान सन्मान मिळत नसल्याची खंत हमाल बांधवांच्या बोलण्यातून जाणवली. श्रमप्रतिष्ठा दिनाच्या पार्श्वभूमीवर हमाली काम करणाऱ्या माथाडी कामगारांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मुकुंदनगर येथील युसूफ सय्यद पूर्वी दुकानात काम करायचे. दिवसभराची रोजंदारी ६० रुपये. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसे. त्यामुळे ते हमाली कामाकडे वळाले. आडतबाजार, दाळमंडई परिसरात २५५ हमाल पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबराब राबतात. व्यापाऱ्यांचा माल तालुक्याच्या गावातील दुकानात पोहचविण्याची जबाबदारी इमाने इतबारे पार पाडतात. शनिवारी दिवसभरात फक्त २० रुपये मिळाले. असुरक्षित असले तरी हमाली कामच आमची प्रतिष्ठा आहे. युसूफचा मोठा मुलगा बारावी नापास झालाय. त्याला कापडदुकानात कामाला जुंपले. छोटा मुलगा धार्मिक शिक्षण घेतो. धार्मिक क्षेत्रात तो करिअर करणार आहे. पारनेर या दुष्काळी तालुक्यातील जामगावचे हल्लाळ यांच्या आयुष्यातील कमाईची सुरूवातच हमाली कामातून झाली. तीन भाऊ, तीन बहिणी अशा मोठ्या कुटुंबाच्या काफिल्यात उत्तमराव वाढत होते. वडील विहीर खोदाईचे काम करत. दुष्काळाच्या स्थितीत जिरायती जमीनही नापीक झाली. त्यामुळे पंचायत झाली. अशातच मामा हरिभाऊ मुंजाळ भेटले. त्यांनी नगरला आणले. तेही हमाली काम करायचे. त्यांनी हमाली कामाला जुंपले. मुलगा चांगला म्हणून मग जावई करून घेतले. हमाली कामातूनच पोटापाण्याची गुजराण सुरू झाली. शेती जिरायती असल्याने गावाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. मुलगा व्यापारी पेढीत दिवाणजीचे काम करतो. वर्षभरापूर्वी मोटारसायकलला झालेल्या अपघातात पाय फ्रॅक्चर झाला. पायात डॉक्टरांनी सळई टाकली. पण अशातही हमाली काम हीच पूजा मानून काम करत असल्याचे सांगताना श्रम हीच प्रतिष्ठा मानतो. त्याशिवाय घरात स्वयंपाक होऊ शकत नाही अशी उद्विवग्नताही त्यांनी व्यक्त केली.