शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्सनल लॉ’वरील अहवाल मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 02:50 IST

मुस्लिमांसह अन्य धार्मिक अल्पसंख्यक समाजातील विवाह, घटस्फोट आणि संरक्षणाशी संबंधित वैयक्तिक कायद्याच्या (पर्सनल लॉ) विविध पैलूंवर विचार करण्यासाठी

नवी दिल्ली : मुस्लिमांसह अन्य धार्मिक अल्पसंख्यक समाजातील विवाह, घटस्फोट आणि संरक्षणाशी संबंधित वैयक्तिक कायद्याच्या (पर्सनल लॉ) विविध पैलूंवर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.या समितीचा अहवाल सहा आठवड्यांच्या आत सादर करण्यात यावा, असे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्या. यू. यू. ललित यांच्या पीठाने केंद्रातर्फे न्यायालयात हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. शायरा बानो या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरून या पीठाने अल्पसंख्यक कामकाज मंत्रालयाला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. शायरा बानो हिने मुस्लिमांमधील प्रचलित बहुविवाह, तीनदा तलाक शब्द उच्चारणे (तलाक-ए-बिदत) आणि निकाह हलाल प्रथेच्या घटनात्मकतेलाच आव्हान दिलेले आहे. ‘माझा पती आणि सासरच्या लोकांनी हुंडा मागितला. माझा अनन्वित छळ केला आणि मादक पदार्थ दिले, ज्यामुळे माझी स्मरणशक्ती दुर्बल झाली. त्यानंतर पतीने तीनदा तलाकचा उच्चार करून मला घटस्फोट दिला,’ असे शायरा बानोने याचिकेत म्हटले आहे. बानोने मुस्लीम पर्सनल लॉ (शरियत) अप्लिकेशन कायदा १९३७ च्या कलम २ च्या घटनात्मकतेला तसेच ‘डिझॉल्यूशन आॅफ मुस्लीम मॅरिजेस अ‍ॅक्ट १९३९’लाही आव्हान दिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)