शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल फुले मार्केटच्या ८०० गाळ्याचे सर्वेक्षण तलाठी आंदोलनाचा फटका : तहसीलदार आज जिल्हाधिकार्‍यांना अहवाल देणार

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

जळगाव : सेंट्रल फुले मार्केटच्या जागेच्या मालकीचा वाद सुरू असतानाच या मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची मागणी व्यापार्‍यांनी फेडरेशन स्थापन करून महसूल विभागाकडे केली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी तयार केलेल्या १२ पथकांनी सुमारे ८०० दुकानांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित १२५ दुकानांचे सर्वेक्षण शुक्रवारी पूर्ण करून तहसीलदार गोविंद शिंदे सर्वेक्षणाचा अहवाल संध्याकाळी जिल्हाधिकार्‍यांना सादर करणार आहेत.

जळगाव : सेंट्रल फुले मार्केटच्या जागेच्या मालकीचा वाद सुरू असतानाच या मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची मागणी व्यापार्‍यांनी फेडरेशन स्थापन करून महसूल विभागाकडे केली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी तयार केलेल्या १२ पथकांनी सुमारे ८०० दुकानांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित १२५ दुकानांचे सर्वेक्षण शुक्रवारी पूर्ण करून तहसीलदार गोविंद शिंदे सर्वेक्षणाचा अहवाल संध्याकाळी जिल्हाधिकार्‍यांना सादर करणार आहेत.
२४ जणांकडून सेंट्रल फुले मार्केटचे सर्वेक्षण
तहसीलदार गोविंद शिंदे यांनी या सर्वेक्षणासाठी १२ पथक तयार केले आहेत. प्रत्येक पथकात दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक सर्वेक्षणात मनपाने गाळ्याची विक्री कुणाला केली आहे. सद्यस्थितीला या गाळ्यांमध्ये कुणाचे दुकान आहे. तसेच शॉप ॲक्ट लायसन्स कुणाच्या नावावर आहे. व्यापार्‍यांना जो गाळा देण्यात आला आहे, त्याचे क्षेत्र किती आहे, याची तपासणी करीत आहेत.

आज जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर
1 सेंट्रल फुले मार्केटच्या व्यापार्‍यांनी फेडरेशन तयार करीत शासनाकडे काही दिवसांपूर्वी मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची विनंती केली आहे. या मार्केटमध्ये सुमारे ९१५ गाळे आहेत. त्यापैकी महसूल कर्मचार्‍यांनी दोन दिवसात ८०० गाळ्यांचे सर्वेक्षण केले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे.
2 सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार गोविंद शिंदे हे आपला अहवाल जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना सादर करतील. त्यानंतर एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
3 सेंट्रल फुले मार्केटचे सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर महसूल विभागातील अव्वल कारकून व लिपीक याचे सर्वेक्षण करीत आहेत. तलाठी आपल्या मागण्यांसाठी संपावर असल्याने महसूल कर्मचार्‍यांना आपले दैनंदिन कामे तसेच सर्वेक्षणाचे काम करण्याची कसरत करावी लागत आहे. तहसीलदारांनी तयार केलेल्या १२ पथकांमध्ये २४ कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

८०० दुकानांचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरित १२५ दुकानांचे सर्वेक्षण शुक्रवारी पूर्ण होऊन संध्याकाळी जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यात येईल.
-गोविंद शिंदे, तहसीलदार