शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापमं घोटाळा उजेडात आणणाऱ्या डॉक्टरची बदली

By admin | Updated: July 21, 2015 00:27 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विक्रम वर्मा यांची अलीकडेच सीबीआयकडे तक्रार करणारे जागले कार्यकर्ते (व्हिसलब्लोअर) सरकारी डॉक्टर आनंद

भोपाळ : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विक्रम वर्मा यांची अलीकडेच सीबीआयकडे तक्रार करणारे जागले कार्यकर्ते (व्हिसलब्लोअर) सरकारी डॉक्टर आनंद राय यांच्यावर बदलीची कुऱ्हाड कोसळली आहे. मध्यप्रदेश सरकारने रविवारी त्यांची तडकाफडकी इंदूरहून धर जिल्ह्यात बदली करणारा आदेश जारी केला.वर्मा यांनी मुलीला गाझियाबादच्या संतोष वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर भोपाळच्या गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तिला बदली प्रवेश मिळवून देताना आपल्या राजकीय प्रभावाचा वापर केल्याचा आरोप राय यांनी सीबीआयकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. व्यापमं घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांपैकी एक असलेले राय हे इंदूरच्या आरोग्य प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. गेल्याच महिन्यात सरकारी डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नी गौरी यांची महू येथील नागरी रुग्णालयातून उज्जैन जिल्ह्यात बदली करण्यात आली. बदलीमुळे विचलित न होता राय यांनी न्यायालयात आव्हान देण्याचे ठरविले आहे. त्यांनी १७ जुलै रोजी वर्मा यांच्याविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणारव्हिसलब्लोअरपैकी असलेले अन्य एक कार्यकर्ते आशिष चुतर्वेदी यांनी राय आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना पत्र पाठविणार असल्याची माहिती दिली. (वृत्तसंस्था)