शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूमध्ये ‘निर्भया’ची पुनरावृत्ती

By admin | Updated: November 7, 2015 04:04 IST

कर्नाटकच्या बंगळुरू जिल्ह्यात दिवसाढवळ््या धावत्या बसमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला बसमधून बाहेर फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना

दोघांना अटक : धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार

बंगळुरू : कर्नाटकच्या बंगळुरू जिल्ह्यात दिवसाढवळ््या धावत्या बसमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला बसमधून बाहेर फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बसचाचालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे. होसकोटे या ग्रामीण भागातील सुलीबेले येथे गुरुवारी ही घटना घडली.बंगळुरू शहरात महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, गेल्या महिन्यातच एका २२ वर्षीय बीपीओ कर्मचारी तरुणीवर व्हॅनमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यापाठोपाठ ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सकाळी ७ वाजता कामावर जाण्याकरिता या बसमध्ये बसली होती. त्यावेळी वाहनचालक आणि क्लीनरशिवाय बसमध्ये कुणीही नव्हते. वाहनचालकाने बसच्या क्लीनरला बस चालविण्यास सांगितले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर एका निर्जन ठिकाणी पीडितेला बसमधून फेकून दोघेही फरार झाले. पीडित तरुणी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बसचालक आणि क्लीनर या दोघांनाही अटक करून बस ताब्यात घेतली. (वृत्तसंस्था)सरकार अशा घटना कदापि सहन करणार नाही आणि गुन्हेगारांवर कायद्यानुसार त्वरित कारवाई होईल. - जी. परमेश्वरा, गृहमंत्री, कर्नाटक