शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सहा तास वीजपुरवठा बंद पूर्वसूचना न देता दुरुस्तीची कामे : नागरिक हैराण, अनेक भागात तक्रारी

By admin | Updated: February 14, 2016 00:41 IST

जळगाव- महावितरणतर्फे शहरात वीज तारांना अडथळा ठरणार्‍या फांद्या तोडणे, तारा ओढणे व दुरुस्तीची इतर कामे शनिवारी सकाळीच हाती घेण्यात आली. पण दुरुस्तीची कामे हाती घेताना शहरवासीयांना पूर्वसूचना कुठल्याही माध्यमाद्वारे दिली नाही. यामुळे लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याबाबतची विचारणा करणारे फोन महावितरणच्या कार्यालयात दिवसभर खणाणत होते.

जळगाव- महावितरणतर्फे शहरात वीज तारांना अडथळा ठरणार्‍या फांद्या तोडणे, तारा ओढणे व दुरुस्तीची इतर कामे शनिवारी सकाळीच हाती घेण्यात आली. पण दुरुस्तीची कामे हाती घेताना शहरवासीयांना पूर्वसूचना कुठल्याही माध्यमाद्वारे दिली नाही. यामुळे लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याबाबतची विचारणा करणारे फोन महावितरणच्या कार्यालयात दिवसभर खणाणत होते.
नागरिकांच्या तक्रारी, प्रश्नांना उत्तरे देताना महावितरणच्या अधिकार्‍यांचीही भंबेरी उडाली. काही नागरिक तर तक्रारी घेऊन थेट कोंबडी बाजारमधील महावितरणच्या पॉवर हाऊसमध्ये पोहोचले. त्यांना दुरुस्तीची कामे सुरू असल्याने वीज बंद केली, असे स्पष्टीकरण वरिष्ठांनी दिले.

या भागात वीज गुल
शहरात रिंगरोड, गणेश कॉलनी, भगवाननगर, भगवाननगर, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक, भास्कर मार्केट आदी भागात वीजपुरवठा तब्बल सहा तास बंद होता. यापैकी काही भागात सकाळी नऊ ते चार आणि काही भागात सकाळी ११ ते सायंकाळी पाच या दरम्यान वीज बंद करण्यात आली होती.

लोडशेडिंग सुरू झाल्याची चर्चा...
वीज दीर्घकाळ बंद असल्याने लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याची विचारणा थेट महावितरणच्या कार्यालयात नागरिकांनी केली. त्यावर दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने वीज बंद करावी लागली, असे स्पष्टीकरण अधिकार्‍यांनी नागरिकांना दिले.

पूर्वसूचना पोहोचलीच नाही
कुठलेही दुरुस्तीचे किंवा इतर काम हाती घेताना वीजपुरवठा बंद करावा लागतो. तो चार ते सहा तास बंद करायचा असतो. यापेक्षा अधिक वेळ तो बंद करता येत नाही. पण वीजपुरवठा बंद करताना त्याची पूर्वसूचना वृत्तपत्र किंवा इतर माध्यमांद्वारे प्रसिद्ध, प्रसारित करावी लागते. नेमकी हीच प्रसिद्धी किंवा वीज बंद ठेवण्याबाबतची माहिती महावितरणतर्फे शनिवारी देण्यात आली नाही आणि कामे हाती घेण्यात आली. ती सायंकाळपर्यंत सुरू होती, असे सांगण्यात आले.

दोन विभागांमध्ये कामे
महावितरणचे शहरात दोन विभाग आहेत. या दोन्ही विभागांमधील १० फिडरची वीज बंद केली होती. त्यासंदर्भात दोन अतिरिक्त कार्यकारी अभियंता, १६ अभियंता कार्यवाहीसाठी नियुक्त केले होते. अर्थातच वीज बंद केल्याची पूर्वसूचना न देण्यास हे अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर शहराची जबाबदारी पार पाडणारे कार्यकारी अभियंता एस.एस.सदामते यांनी आपल्या अधिकार्‍यांना विचारणा केल्याची माहिती मिळाली.