रेणुका बचत गटाचे हळदी-कुंकू
By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST
अहमदनगर : रेणुका महिला स्वयंसहायता गटाच्यावतीने गंज बाजार येथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महापौर सुरेख कदम या उपस्थित होत्या. गटाच्या अध्यक्षा योगिता देवळालीकर यांनी उपस्थितांना बचतगटाची माहिती दिली. या वेळी उपस्थित महिलांसाठी काही खेळही आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर कदम यांनी या महिलांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती दोशी यांनी केले. कार्यक्रमास रेणुका डावरे, सुधा डावरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.