शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 06:47 IST

कायदा कधीही अंध नसतो, तो शिक्षेचा प्रतीक नाही, कायदा सर्वांना समानतेच्या नजरेतून पाहत असतो ही मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न 

नवी दिल्ली : तुम्ही अनेक सिनेमात कोर्टाच्या चित्रिकरणात डोळ्यावर पट्टी बांधलेली न्याय देवतेची मूर्ती पाहिलेली आहे. परंतु, आता सुप्रीम कोर्टाने लेडी ऑफ जस्टीस म्हणजे न्यायदेवीची नवीन मूर्ती समोर आणली आहे. या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली आहे. कायद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याने त्याला काही दिसत नाही, असे चित्र निर्माण होत होते, ते बदलण्यासाठी आता नवीन मूर्ती आणली आहे. ही मूर्ती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या लायब्ररीत लावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही नवी मूर्ती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ऑर्डर देऊन बनवली आहे. यामागचा हेतू म्हणजे आता देशात कायदा आंधळा नाही किंवा शिक्षेचे प्रतीक नाही. कोर्टात ठेवलेली ही मूर्ती लेडी ऑफ जस्टीस नावाने ओळखली जात होती. न्यायदेवतेची आतापर्यंत ही प्रतिमा सगळीकडे वापरण्यात येत होती. त्यात डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधलेली दिसायची. 

काय आहे नवीन मूर्तीमध्ये खास? - न्याय देवतेची नवीन मूर्ती पूर्ण पाढऱ्या रंगाची आहे.- प्रतिमेत न्याय देवतेला भारतीय वेशभूषेत दाखवण्यात आले आहे, त्यात प्रामुख्याने साडी दिसते. - डोक्यावर सुंदर मुकूट आहे, कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक आभूषणे आहेत.- न्याय देवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान पकडल्याचे दाखवण्यात आले आहे.

जुन्या मूर्तीमध्ये एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार होती. इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा सुरू होती, ती आता बदलायला हवी, कायदा कधीही अंध नसतो. तो सर्वांना समान पाहतो, असे दाखवणे गरजेचे होते. 

जुनी प्रतिमा आली कुठून?न्याय देवतेची ही प्रतिमा युनानमधून आली, न्यायाचे प्रतीक म्हणून तिथे प्राचीन देवी आहे. तिचे नाव जस्टिया होते, त्याच नावाने जस्टीस शब्द तयार झाला. डोळ्यावर पट्टी बांधणे म्हणजे न्याय देवी नेहमी निष्पक्षपणे न्याय करेल. 

कुणालाही पाहून न्याय करताना एकाची बाजू घेतली जाईल, त्यामुळे तिच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचे सांगितले जाते. युनानमधून ही प्रतिमा ब्रिटनमध्ये पोहचली. १७व्या शतकात एक इंग्रजी अधिकारी ते भारतात घेऊन आले. ब्रिटिशांच्या काळात १८व्या शतकात न्याय देवतेची ही मूर्ती सार्वजनिक वापरात आली. 

टॅग्स :Courtन्यायालयGovernmentसरकार