शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदल, ऊर्जा संकटावर तोडगा काढा

By admin | Updated: February 23, 2016 03:01 IST

वातावरण बदल, ऊर्जा संकट आणि जीवघेण्या आजारांवर तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) दीक्षांत समारंभात बोलताना विद्यार्थ्यांना केले.

वाराणसी : वातावरण बदल, ऊर्जा संकट आणि जीवघेण्या आजारांवर तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) दीक्षांत समारंभात बोलताना विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थ्यांनी केवळ कट- पेस्टवर विश्वास न ठेवता सृजनात्मक कार्य आणि संशोधनावर भर देत जगासमोरील आव्हानांना सामोरे जावे. औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतरही ग्रहणशीलता आणि नवे ज्ञान मिळविण्यासाठी उत्सुक असावे. देशातील युवक आणि महिलांसमक्ष मी आव्हान हे ठेवत आहे. जागतिक तापमान थोडे कमी करण्यासाठी मदत होईल किंवा भीषण ऊर्जा संकटावर मात करता येईल असे संशोधन त्यांनी समोर आणावे. नवीकरणाचे किंवा सातत्यपूर्ण पर्यायी स्रोत शोधले जात नसेल तर मानवतेसमोर मोठे संकट उभे ठाकले जाऊ शकते. देश आणि जगासमोरील समस्यांवर तोडगा काढण्याचे स्वप्न बघितले जावे, असे ते सोमवारी विद्यार्थी आणि बीएचयूचे शिक्षणतज्ज्ञांना संबोधित करताना म्हणाले. (वृत्तसंस्था) घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण.... बीएचयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीबद्दल घोषणा देणाऱ्या आशुतोष सिंग या विद्यार्थ्याला भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे या समारंभात काही काळ तणाव निर्माण झाला. मोदी भाषण संपवून जात असताना आशुतोषने घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. मानद पदवीस नकार...1 मोदींनी सोमवारी बीएचयूची मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास नकार दिला. त्यासंबंधी प्रस्ताव मी नम्रपणे नाकारत आहे, असे त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले. बनारस हिंदू विद्यापीठाला भेट देणे ही बाबच माझ्यासाठी अभिमानाची आहे. डॉक्टरेट प्रदान करण्याबाबत मला विद्यापीठाकडून पत्र मिळाले होते. 2 मी नम्रपणे त्याला नकार दिला. मी अशा बाबींपासून स्वत:ला दूर ठेवणे चांगले राहील, असे मला वाटते. या विद्यापीठाचे कुलपती, कुलगुरूंनी माझी त्यासाठी निवड केल्याबद्दल मी आभारी आहे, असेही मोदींनी दीक्षांत समारंभात म्हटले.