शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराची प्रकरणे त्वरित निकाली काढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 22:19 IST

भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून, अशी प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश केंद्रीय दक्षता

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून, अशी प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आपल्या अखत्यारीतील सर्व विभागांना दिले आहेत.सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्याकडे अगोदर लक्ष द्यायला पाहिजे आणि या संदर्भात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल, असे सीव्हीसीने सर्व मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांसाठी पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.प्रलंबित असलेले चौकशी अहवाल, जागल्यांकडून (व्हिसल ब्लोअर्स) मिळालेल्या तक्रारी, दंडाबाबत आपण केलेल्या सूचनांची अंमलबजावणी आणि विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे असलेल्या प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर सीव्हीसीने हे निर्देश दिले. ‘अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यात प्रचंड विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेली प्रकरणे ताबडतोब निकाली काढण्यात यावी, असे आयोगाला वाटते,’ असे या परिपत्रकात म्हटले आहे.आपापल्या विभागांतील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना जलद गतीने निपटारा करण्यासाठी योजना तयार करावी, असेही सीव्हीसीने मुख्य दक्षता अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यात आला की नाही याचा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल, असेही सीव्हीसीने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)