शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाजांनी लाटलेले १८०० कोटी काढून घ्या

By admin | Updated: September 11, 2015 05:28 IST

सत्यम् कॉम्प्युटर्स या कंपनीत अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून अवैध मार्गाने कमावलेल्या आणि संस्थापक बी. रामलिंगम राजू यांच्याशी संबंधित असलेल्या घोटाळ्यातील

मुंबई : सत्यम् कॉम्प्युटर्स या कंपनीत अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून अवैध मार्गाने कमावलेल्या आणि संस्थापक बी. रामलिंगम राजू यांच्याशी संबंधित असलेल्या घोटाळ्यातील १० लाभार्थींनी १,८०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम संस्थांनी परत करावी, असा आदेश वित्तीय बाजाराचे नियमन करणाऱ्या ‘सेक्युरिटिज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया’ (सेबी)ने दिला आहे.हा घोटाळा उघड झाल्यानंतर सात वर्षांनी हा आदेश दिला गेला आहे. गैरव्यवहार करून घोटाळेबाजांंनी लबाडीने कमावलेला लाभ त्यांच्या घशातून काढून घेण्याच्या अशा प्रकारच्या आदेशास ‘सेबी’च्या परिभाषेत ‘डिसगॉर्जमेंट आॅर्डर’ म्हटले जाते. रामलिंगम राजू यांनी आपल्या या कंपनीची खातेपुस्तके लिहिताना कित्येक वर्षे मोठा घोटाळा केला गेल्याची कबुली ज्या दिवशी स्वत:हून दिली त्या दिवसापासून (७ जानेवारी २००९) या १० व्यक्ती व संस्थांनी व्याजापोटी आणखी सुमारे १,५०० कोटी रुपयेही द्यायचे आहेत. कंपनीच्या वास्तविक वित्तीय स्थितीविषयी असलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री करून (इन्सायजर ट्रेडिंग) अनुचित लाभ घेतल्याबद्दल हा आदेश दिला गेला आहे. दरम्यान, आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनियरिंग व कन्स्ट्रक्शन कंपनी ही सत्यम कॉम्प्युटर्स किंवा मेटास यांच्या संदर्भात ‘इन्सायडर’ नव्हती किंवा कंपनीविषयीची अप्रकाशित संवेनशील माहितीही त्यांना उपलब्ध नव्हती, असे नमूद करून ‘सेबी’ने या कंपनीविरुद्ध बाजारात व्यवाहर करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढलेला नाही. (विशेष प्रतिनिधी)