धर्म अध्यात्म
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
धर्म अध्यात्म
धर्म अध्यात्म
धर्म अध्यात्म पापाचे प्रक्षालन करण्यासाठी जीवन : मुनीश्री सुवीरसागरनागपूर : जीवनाचा उपयोग आपण पाप करण्यासाठीच करतो. त्यात आपला स्वार्थ असतो. पण स्वत:चा स्वार्थ साधताना आपण आपले आध्यात्मिक नुकसान करीत असतो. मानवी जीवन हे पाप करण्यासाठी नव्हे तर पापाचे प्रक्षालन करण्यासाठी आहे. पुण्यकर्म करून आपण आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी जीवन आहे, असा उपदेश मुनीश्री सुवीरसागर महाराजांनी केला. श्री सैतवाळ जैन संघटना मंडळाच्यावतीने महावीर नगर मैदान येथे आयोजित प्रवचनात ते बोलत होते. आपण केवळ स्वार्थच पाहतो पण त्यामुळे आपले नुकसान होते. प्रत्येक बाबीचा शार्टकट आपल्याला हवा असतो पण अध्यात्मात असा शार्टकट नाही. त्यासाठी ईश्वराला समर्पित होण्याची तयारी असावी लागते, असे महाराजांनी सांगितले. याप्रसंगी सिंचन जैन जयंतीबेन जैन, भाई सुरेशकुमार जैन, विमलताई जैन, सागर यांचा सन्मान करण्यात आला. अरुण श्रवणे, अशोक शहाकार, आनंदराव सवाने आदींनी यावेळी समवशरण मध्ये भक्ती केली.