धर्म-अध्यात्म
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
ब्राचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती महोत्सव
धर्म-अध्यात्म
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती महोत्सवनागपूर : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जयंती महोत्सवाला आजपासून बजाजनगरातील ज्ञानेश्वर मंदिरात प्रारंभ झाला आहे. महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, ३१ जानेवारीला पहाटे जन्मसोहळा कीर्तन होईल. शैलगमन यात्रा उत्सवनागपूर : त्रिगुणात्मक दत्त शैलगमन यात्रा उत्सव शुक्रवार, ३० जानेवारीपासून सुरू होत आहे. अमरावती मार्गावरील भरतनगर नागरिक मंडळाने ८ फेब्रुवारीर्पंत या उत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये रोज विविध प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंडळाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. गुरुस्वामींचा महासत्संग १लानागपूर : गुरुस्वामी विश्व मिशन आनंदनगर शाखेतर्फे गुरुस्वामी महासत्संग सोहळा खापरीपुरा इतवारी येथे १ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. मिशनचे मुख्य आचार्य जगद्गुरू समर्थ राधेश्यामस्वामी तसेच गुरुमाऊली रमादेवी यावेळी उपस्थित राहतील. दुपारी १ ते ३ या वेळेत गुरुपुजा व दर्शन होईल. दुपारी ४ वाजता खापेकर महाराज यांचे ग्रामगीतेवर खंजेरी भजन, त्यानंतर राधेश्यामस्वामी यांचे कीर्तन होईल. सामूहिक पारायणश्री संत गजानन महाराज पारायण सेवा समितीतर्फे १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२.३० या वेळेत रेणुका मंदिर, रेणुका लेआऊट यशोदानगर, हिंगणा टी पॉईंट येथे सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. दक्षिणामूर्ती प्रतिष्ठापनोत्सवनागपूर : महाल येथील श्री दक्षिणामूर्ती मंदिराचा वार्षिकोत्सव उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात प्रा. रविंद्र साधू, हभप मुकुंदबुवा देवरस, हभप मोहनबुवा कुबेर, हभप आदित्यबुवा देशकर, मकरंदबुवा हरदास व श्यामबुवा हरदास यांचे किर्तन रोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होईल. बुधवारी गायक विलास पुजारी यांचे गायन होईल.