शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

धर्म नको संघर्षाचे कारण

By admin | Updated: January 26, 2015 03:30 IST

एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये,

नवी दिल्ली : एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये, असे प्रतिपादन ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज रविवारी केले़‘धर्म ऐक्याची शक्ती आहे़ आपण याला संघर्षाचे कारण बनू देऊ शकत नाही’, या महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण करून देत, देशातील विविध धर्मसमुदायातील परस्पर सहकार्य आणि सद्भावनेवर राष्ट्रपतींनी यावेळी भर दिला़ ते म्हणाले की, लोकशाहीने बहाल केलेले स्वातंत्र्य कधीकधी उन्माद निर्माण करते़ हा उन्माद आपल्या पारंपरिक प्रकृतिविरुद्ध आहे़ शब्दांचा हिंसाचार दु:ख, वेदना देऊन लोकांच्या भावना दुखावते़ गांधीजी म्हणायचे, धर्म ऐक्याची शक्ती आहे़ ते संघर्षाचे कारण बनता कामा नये़ भारताने कायम सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवला आहे़ हा सर्वधर्मसमभाव हीच भारताची खरी ओळख आहे़भारतीय राज्यघटना लोकशाहीचे पवित्र पुस्तक आहे़ भारताच्या राज्यघटनेने सर्वधर्मसमभाव शिकवला़ विविध धर्मसमुदायातील सहशनशीलता, सद्भावना वाढवली़ आता या मूल्यांची अधिक सावधगिरीने जपणूक करण्याची गरज आहे़देशात धर्मांतराच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना आणि काही हिंदुत्ववादी संघटना व पक्षांकडून महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे याचे महिमा पठण सुरू असताना, राष्ट्रपतींनी सर्वधर्मसमभावावर भाष्य करणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे़दहशतवादाच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्ताला लक्ष्य केले़ भारत आपल्या शत्रूंबाबत गाफिल राहण्याचा धोका पत्करू शकत नाही़ शांती, अहिंसा आणि एक उत्तम शेजारी देश भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे आहेत़ पण भारताच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या शत्रूंपासून भारत गाफिल राहू शकत नाही़ भारत आणि भारताच्या जनतेविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या शत्रूंना नामोहरम करण्याची सर्व शक्ती आमच्याकडे आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़महिलांवरील अत्याचार, बलात्कार, हुंड्यासाठी त्यांचा छळ या सामाजिक कुप्रथांवरही राष्ट्रपतींनी प्रहार केला़ बलात्कार, रस्त्यांवर महिलांची काढली जाणारी छेड, हुंड्यासाठी तिची हत्या यामुळे महिलांना भयभीत केले आहे़ हे बघणे दु:खदायी आहे़ महिलांचा सन्मान करणारा आणि त्यांना सक्षम करणारा देशच एक जागतिक शक्ती बनू शकतो़ म्हणूनच प्रत्येक भारतीयाने महिलांना कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून बचाव करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले़