शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सात राज्यांतच शेतक-यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST

नैसर्गिक आपत्तीतून पिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणा-या पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत देशभर शेतकरी वर्गावर भ्रमनिरास होण्याची पाळी आली आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : नैसर्गिक आपत्तीतून पिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणा-या पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत देशभर शेतकरी वर्गावर भ्रमनिरास होण्याची पाळी आली आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंडसह सात राज्ये वगळता खरीप पिकांच्या नुकसानीपोटी अन्य राज्यात विम्याची पूर्ण रक्कम शेतक-यांच्या हाती लागलेली नाही.पंतप्रधान पीक विमा योजनेचा २0१६ च्या खरीप हंगामात सरकारने शुभारंभ केला. बिगरमोसमी पाऊस, गारपीट व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विम्याच्या रकमेबाबत ४५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेला प्रतिसाद देत २२ राज्यांतील ५९ लाख ९५ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी पिकांचा विमा उतरवला.ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनी नुकसान भरपाईपोटी ५५१५ कोटी ५२ लाख रुपये रकमेची मागणी केली. यापैकी किमान आंशिक रक्कम नियमानुसार ४५ दिवसात शेतकºयांना मिळणे आवश्यक होते. प्रत्यक्षात १९ जुलैपर्यंत फक्त ३३१४.१५ कोटी रुपयांचीच भरपाई शेतकºयांच्या पदरात पडली. पीक विमा योजनेत नुकसान भरपाईपोटी द्याव्या लागणाºया रकमेच्या ३३ टक्के रक्कम विमा कंपनी देते व बाकी ६७ टक्के रकमेत प्रत्येकी ५0 टक्के रक्कम राज्य व केंद्र सरकार सबसिडीच्या स्वरूपात विमा कंपनीला अदा करते.राज्य सरकारांना या योजनेत फारसा रस नाही. महाराष्ट्रात पीक विमा भरण्याच्या मुदतीवरूनशेतकरी वर्गाचा आक्रोश सुरू आहे. देशाच्या अन्य राज्यांतही पीक विम्याच्या अमलबजावणीची स्थिती दारूण आहे.