शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर व पुनद धरणातून पाणी सोडा

By admin | Updated: January 24, 2016 22:39 IST

जे. पी. गावित यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

जे. पी. गावित यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी कळवण : तालुक्यातील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात व पुनद धरणातून पुनद नदीतून सुळे डावा कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी आमदार जे.पी. गावित यांच्याकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा करीत आमदार गावित यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचेकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन रविवारी (दि. २४) पाणी सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या असून गावित यांच्या हस्ते पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती माकपचे सेक्र ेटरी हेमंत पाटील यांनी दिली. कळवण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून भादवण, विसापूर, बिजोरे, चाचेर, पिळकोस, काकाणे, दरेभणगी, मोकभणगी गणोरे, देसराणे, धणेर, अभोणा, बार्डे, कळमथे, पाळे, एकलहरे, कळवण, मानूर, नाकोडे, बेज अशा कित्येक गावातील पाणीपुरवठा योजनाच्या विहिरींनी तळ गाठल्याने योजना कोरड्या झाल्या आहेत, त्यामुळे पिण्याचा पाणी प्रश्न भेडसावत आहे. चणकापूर धरणाचे व पुनद धरणाचे पाणी पाटबंधारे खात्याने तात्काळ सोडून जनतेला पाणी देवून दिलासा द्यावा अशी मागणी या भागातील शेतकरी बांधवांनी केली होती. शेतकर्‍याच्या मागणीची कैफियत जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागासमोर मांडून आमदार गावित यांनी तत्काळ दोनही धरणाचे पाणी गिरणा व पुनद नदीत सोडण्याची मागणी केली. (वार्ताहर)(फोटो : आयटीपीएचला २३ कळवण १ नावाने सेव्ह आहे. )