शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वहिनी, पोलिसांच्या त्रासाने कंटाळून वृद्धाची आत्महत्या आत्महत्या पूर्वचिठ्ठीबाबत गोपनियता : निमखेडी येथील मयताच्या नातेवाइकांचा रास्तारोको

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

जळगाव- घराशेजारीच रहिवासाला असलेल्या वहिनीचा त्रास आणि तिच्या माध्यमातून पैसे उपटणारे काही पोलीस यांच्या त्रासामुळे निमखेडी येथील वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केली. सोमवारी सकाळी चंदूअण्णानगरनजीक हा प्रकार उघडकीस आला. वृद्धाने आत्महत्या पूर्वचिठ्ठी लिहिली आहे. ती मात्र तालुका पोलिसांनी दाखविली नाही. तर या आत्महत्येमागे पोलिसातील कुठलाही कर्मचारी जबाबदार नाही, असा खुलासा तालुका पोलिसातील निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी केला आहे.

जळगाव- घराशेजारीच रहिवासाला असलेल्या वहिनीचा त्रास आणि तिच्या माध्यमातून पैसे उपटणारे काही पोलीस यांच्या त्रासामुळे निमखेडी येथील वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केली. सोमवारी सकाळी चंदूअण्णानगरनजीक हा प्रकार उघडकीस आला. वृद्धाने आत्महत्या पूर्वचिठ्ठी लिहिली आहे. ती मात्र तालुका पोलिसांनी दाखविली नाही. तर या आत्महत्येमागे पोलिसातील कुठलाही कर्मचारी जबाबदार नाही, असा खुलासा तालुका पोलिसातील निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी केला आहे.
रतिलाल उर्फ रतन बाविस्कर (वय ६५) रा.निमखेडी ता.जळगाव असे मयताचे नाव आहे. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून इंदूबाई शांताराम बाविस्कर (वय ६७) हीच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी दुपारपासून कार्यवाही केली, पण ती सापडली नाही. तिचा पती शांताराम बाविस्कर व मोठा मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते.
रतन बाविस्कर यांनी मानसिक छळ व आर्थिक पिळवणुकीमुळे अडचणी निर्माण झाल्याने उद्वीग्न होऊन सुरत रेल्वे लाईनवर आत्महत्या केली. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. आजूबाजूचे रहिवासी व वाहनधारकांना हा प्रकार लक्षात आला.
घरकुलाच्या शौचालयावरून वाद, पोलिसांचा ससेमिरा
मयत रतन याच्या कुटुंबीयांना घरकूल बांधण्यासाठी जागा मिळाली होती. त्यांच्यानजीकच आरोपी इंदूबाई हिचे घर आहे. मयताच्या कुटुंबीयांनी या जागेवर शौचालय बांधू नये, असे इंदूबाईचे म्हणणे होते. यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. हा वाद पोलिसात पोहोचला होता. इंदूबाईच्या तक्रारीनुसार मयत रतन याची पत्नी, मुलगा व सून यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांकडून चौकशी
अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पोलिसातील नाईक संजय चौधरी यांनी मयत रतन याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. रतनची पत्नी, मुलगा व सून यांना तालुका पोलिसात बोलाविले होते. तसेच कलम १४९ नुसार रतन याच्या कुटुंबीयांना नोटिसही पाठविली होती. ही चौकशी व वहिनी इंदूबाईचा त्रास यामुळे रतन हा त्रस्त झाला होता.
पोलिसाने पैसे उपटल्याचा आरोप
मयत रतनचे शव जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर काही नातेवाइक उभे राहीले. त्यांनी रास्ता रोको केला. एका पोलिसाने चौकशीनंतर प्रकरण मिटविण्यासाठी चार हजार रुपये घेतले व आज सकाळी आणखी दोन हजार रुपये त्याला द्यायचे होते. चौकशांची भीती व पैशांचाअभावयाच्यानेनिराश,हताशझालेल्यारतनबाविस्करयांनीपोलीसवइंदूबाईमुळेआत्महत्याकेली.आरोपींनाअटककेलीजावी,अशीमागणीत्याच्यानातेवाइकांनीकेली.