शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या दौऱ्यांची माहिती देण्यास नकार

By admin | Updated: July 16, 2017 01:49 IST

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱ्यांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱ्यांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे. माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेला यासंबंधीचा अर्ज मोघम स्वरूपाचा आहे, असे पीएमओने म्हटले आहे.माहिती अधिकार कार्यकर्त्या नूतन ठाकूर यांनी यासंबंधीची माहिती पीएमओकडे मागितली होती. १६ जून रोजी त्यांनी पीएमओला माहिती अधिकारात अर्ज सादर केला होता. ‘पीएमओने आपणास माहिती नाकारली आहे’, असे नूतन ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर यांनी मोदी आणि मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱ्यांसाठी विविध प्रकारची व्यवस्था करताना नेमका किती खर्च झाला याचा तपशील मागितला होता. जानेवारी २0१0 पासून पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावरील खर्च देण्याची मागणी त्यांनी केली होती.पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय माहिती अधिकारी आणि निम्न सचिव प्रवीण कुमार यांनी ठाकूर यांचा अर्ज फेटाळून लावण्यात येत असल्याचे गुरुवारी त्यांना कळविले. प्रवीण कुमार यांनी म्हटले की, ‘अर्जात मागण्यात आलेली माहिती मोघम स्वरूपाची आणि फारच मोठी आहे. त्यामुळे ती देता येऊ शकत नाही.’ठाकूर यांनी अर्जात दोन्ही पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित सर्व फायलींच्या प्रती मागितल्या होत्या. संबंधित टिपणे, पंतप्रधान कार्यालय आणि अन्य विविध सरकारी कार्यालये यांच्यात झालेला पत्रव्यवहार, तसेच हस्तांतरित झालेले दस्तावेज याच्या प्रतीही त्यांनी मागितल्या होत्या.अपील करणारही माहिती नाकारतानाच प्रवीण कुमार यांनी ठाकूर यांना कळविले की, माहिती अधिकार कायदा २00५ च्या कलम १९ अन्वये आपल्या निर्णयाविरुद्ध पीएमओचे संचालक सय्यद अक्रम रिझवी यांच्यासमोर अपील करता येऊ शकेल.’ नूतन ठाकूर यांनी म्हटले की, ‘आपण या निर्णयाविरुद्ध नक्कीच अपिलात जाऊ. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर नेमका किती खर्च झाला, हे देशाला कळलेच पाहिजे. तो आपला हक्क आहे.