शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षामाफी देण्याचा अधिकार राज्यांना पुन्हा बहाल

By admin | Updated: July 24, 2015 00:25 IST

राज्य सरकारांनी दंड प्रक्रिया संहितेनुसार असलेल्या अधिकाराचा वापर करून जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांना राज्य सरकारांनी शिक्षामाफी

नवी दिल्ली : राज्य सरकारांनी दंड प्रक्रिया संहितेनुसार असलेल्या अधिकाराचा वापर करून जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांना राज्य सरकारांनी शिक्षामाफी देण्यास वर्षभरापूर्वी दिलेली सरसकट स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी काही अटी घालून उठविली.दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४३२ व ४३३ नुसार राज्य सरकारांना कैद्यांची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचे अथवा शिक्षेत कपात करून त्यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे अधिकार आहेत. गेल्या वर्षी ९ जुलै रोजी या अधिकारांच्या व्याप्तीसंदर्भातील एका प्रकरणावर सुनावणी करताना ही स्थगिती दिली गेली होती. सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने आता ही सरसकट स्थगिती सशर्त उठविल्याने राज्य सरकारांना आपले अधिकार पुन्हा वापरता येणार आहेत.राजीव गांधी हत्या खटल्यात फाशी झालेल्या सात कैद्यांचे दयेचे अर्ज राष्ट्रपतींकडे कित्येक वर्षे प्रलंबित राहिले होते. सर्वोच्च न्यायालयाने याच मुद्द्यावर त्यांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप ठोठावली. तोपर्यंतया कैद्यांनी २० वर्षांहून अधिक कारावास भोगला होता. तमिळनाडू सरकारने शिक्षामाफीचा अधिकार वापरून त्यांची राहिलेली शिक्षा माफ करून त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला.याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले व हा खटला केंद्राच्या अधिकारातील सीबीआयने चालविलेला असल्याने राज्य सरकार अशा प्रकारे परस्पर शिक्षा माफ करू शकत नाही, असा मुद्दा मांडला. या प्रकरणावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरु असताना शिक्षामाफीस सरसकट स्थगिती दिली गेली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)