शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

पान-५ मयेत वीज समस्या नित्याचीच; नागरिक हैराण

By admin | Updated: June 13, 2014 06:58 IST

मये : सध्या मयेवासियांना दररोज विजेविना दिवस काढावे लागत आहेत. वीज समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. डोंगराळ आणि शेतीच्या भागातून आणलेली मुख्य वाहिनी दिवसातून चार-पाच वेळा तुटून पडते आणि ती पूर्ववत करताना वीज कर्मचार्‍यांची तारांबळ उडते. मयेवासीय उकाड्यामुळे आणि डासांमुळे त्रस्त झाले आहेत. या कारणामुळे रात्री जागून काढाव्या लागतात.

मये : सध्या मयेवासियांना दररोज विजेविना दिवस काढावे लागत आहेत. वीज समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. डोंगराळ आणि शेतीच्या भागातून आणलेली मुख्य वाहिनी दिवसातून चार-पाच वेळा तुटून पडते आणि ती पूर्ववत करताना वीज कर्मचार्‍यांची तारांबळ उडते. मयेवासीय उकाड्यामुळे आणि डासांमुळे त्रस्त झाले आहेत. या कारणामुळे रात्री जागून काढाव्या लागतात. मये गावासाठी जोडणारी मुख्य वीजवाहिनी नार्वे, वरपाल, बायंगिणी येथील डोंगरमाथ्यावरून आणलेली आहे. ही वीजवाहिनी नंतर इथल्या चिखलमय व दलदलीच्या भागातून पुढे मये गावाला जोडली आहे. लोखंडी खांब गंजलेले आहेत. वीज तारा जुन्या असल्याने हलक्याशा वार्‍यानेही त्या तुटून पडतात. हा भाग अडचणीचा असल्याने रात्रीच्या वेळी दुरुस्ती करण्यात बरीच अडचण निर्माण होते. ही वीजवाहिनी बदलावी म्हणून नागरिकांनी वारंवार मागणी करूनही वीज खात्याने मयेवासियांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावणे पसंत केले आहे.विजेच्या समस्या निवारण्यासाठी मयेत भूमिगत वीजवाहिनी घालणे हाच तेवढा उपाय आहे. शारदानगर येथून किंवा पैरा फिडरवरून अंडरग्राउंड केबल घालून पंचायत कार्यालयापर्यंत आणून येथील फिडरला पुरवठा के ल्यास विजेची समस्या कायमची सुटणार आहे. त्यासाठी डिचोली वीज कार्यालयाने एक योजना तयार केली असून प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, निधीअभावी ती फ ाईल धूळ खात पडली आहे. गेल्या एक महिन्यापासून मयेवासियांना भेडसावणार्‍या विजेच्या समस्येमुळे मयेत संतापाचे वातावरण पसरलेले असून याचा कधीही भडका उडू शकतो. (प्रतिनिधी)