शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! फ्रँकफर्ट विमानतळावर भारतीय महिलेला कपडे उतरवण्यास सांगितले

By admin | Updated: April 2, 2017 11:40 IST

जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर आपल्यासोबत वर्णद्वेशातून गैरवर्तन झाल्याचा आरोप भारतीय वंशाच्या महिलेने केला आहे

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 2 -  जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर आपल्यासोबत वर्णद्वेशातून गैरवर्तन झाल्याचा आरोप  भारतीय वंशाच्या महिलेने केला आहे. आइसलँडमध्ये राहणाऱ्या या महिलेने फ्रँकफर्ट विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी आपणास कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली असून, जर्मनीतील भारतीय दूतावासाकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
श्रुती बसप्पा असे गैरवर्तन झालेल्या भारतीय महिलेचे नाव आहे. त्यांनी फेसबुकवरून या संदर्भातील माहिती दिली आहे. त्या लिहितात,  मी माझ्या कुटुंबासह भारतातून फ्रँकफर्टमार्गे आइसलँडला जात असताना ही घटना घडली.  मी फ्रँकफर्टला उतरल्यावर तेथील सुरक्षा रक्षक मला एका खोलीत घेऊन गेले. त्यांनी मला माझे कपडे वर करण्यास किंवा उतरवण्यास सांगितले, जेणेकरून कपड्यात लपवून काही नेले जात तर नाही ना याची शहानिशा करता येईल. दु:खद बाब म्हणजे माझ्या चार वर्षीय मुलीसमोरच हा प्रकार सुरू होता. 
फूल बॉडी स्कॅन झाल्यानंतरही आपणास कपडे वर करण्यास सांगण्यात आले, असा आरोप श्रुती यांनी केला. मात्र श्रुती यांनी असे करण्यास नकार दिला. अखेर श्रुती यांचे पती तेथे पोहोचल्यावर त्यांना सोडण्यात आले. आपल्यासोबत याआधीही असा प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, श्रुती यांनी य़ा प्रकरणी फ्रँकफर्ट विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे.