दानोळी परिसरात ऊस टोळ्या कमी
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
आल्याने हंगाम लांबणार
दानोळी परिसरात ऊस टोळ्या कमी
आल्याने हंगाम लांबणार* शेतकर्यांसमोर ऊसतोडीचा पेचभालचंद्र नांद्रेकर : दानोळी दानोळी परिसरात यावर्षी ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या कमी प्रमाणात आल्यामुळे ऊसतोडणी संथगतीने सुरू आहे. अनेक टोळ्यांंनी वाहतूकदारांची फसवणूक केल्यामुळे टोळ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गेटकेन कारखान्याच्या टोळ्या अजूनपर्यंत परिसरात फिरकल्या नाहीत. यामुळे ऊस कारखान्यास जाण्यास विलंब होणार असून शेतकर्यांपुढे ऊसतोडीचा पेच निर्माण झाला आहे. ऊसतोडणी हंगाम सुरू झाला की, कधी ऊस जातो या विचारात शेतकरी असतात; परंतु या हंगामात दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, निमशिरगांव, चिपरी, जैनापूर परिसरात मुळातच ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उशिरा कारखान्यास जाणार अशीच चिन्हे निर्माण झाली आहेत. परिणामी शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रत्येक वर्षी ऊस वाहतूकदार ऊस कामगारांना ठरवून ॲडव्हान्स रक्कम देऊन त्यांना घेऊन येतात. यावेळी काही ऊस कामगारांनी वाहतूकदारांना फसविल्याचे प्रकार घडल्यामुळे वाहतूकदार आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गेल्यावर्षीचा ऊसतोडणी हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे लावणी ऊस फेब्रुवारीपर्यंत व खोडवा फेबु्रवारीनंतर तुटला होता. त्यानंतर वाढलेला उन्हाळा व उशिरा पडलेला पाऊस याचा परिणाम झाला. यावर्षीचा खोडवा व निडवा ऊस म्हणावा तसा वाढलेला नाही. त्यामुळे केवळ दहा ते अकरा महिन्यांतच उसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे.दानोळी परिसरात अडसाली ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक असून ऊसतोडणीसाठी फिल्डमनकडे शेतकरी फेर्या मारत आहेत; परंतु त्यांच्याकडून सध्या टोळ्या कमी असून आणखी टोळ्या येणार आहेत. थोडेदिवस थांबा , असे सांगण्यात येत आहे.चौकट - गेटकेन कारखान्याला ऊस देण्याबाबत संभ्रमावस्थादरवर्षी दानोळी परिसरात गेटकेन कारखान्याच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात येतात; परंतु यावर्षी अजूनपर्यंत एकही गेटकेनची टोळी आलेली नाही. मात्र, गेल्यावर्षी गेटकेनच्या काही कारखान्यांनी २२५० चा पहिलाच हप्ता दिला आहे. त्यामुळे यावर्षी गेटकेन कारखान्यांना ऊस द्यायचा का नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.फोटो - १२१२२०१४-जेएवाय-०३फोटो ओळी - दानोळी येथील हा माळरान प्रत्येकवर्षी ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्यांनी भरून गेलेला असतो. मात्र, यावर्षी टोळ्या कमी आल्याने झोपड्यांचे प्रमाण कमी झाले आहे.