शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे टँकरची संख्या निम्म्यावर टंचाई : चाळीसगाव व पारोळा तालुक्यात टँकर बंद

By admin | Updated: July 5, 2016 00:28 IST

जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सलग दोन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी टंचाईच्या स्थितीत वाढ झाली होती. जामनेर, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत होत्या. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकरची संख्या १०५ पर्यंत पोहचली होती. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने १ जुलैपर्यंत ९९ गावांमध्ये ८४ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात होता. चाळीसगाव व चोपडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या ठिकाणच्या जलपातळीत काही प्रमाणात वाढ होऊन टंचाई कमी झाली.चाळीसगाव तालुक्यातील तब्बल १४ तर पारोळा तालुक्यातील १५ टँकर कमी झाले आहेत.
सध्या जळगाव तालुक्यात ९, जामनेर तालुक्यातील २२ गावांमध्ये १९ टँकर, भुसावळ तालुक्यात २, मुक्ताईनगर तालुक्यात २, भडगाव तालुक्यात ४, अमळनेर तालुक्यात १०, पारोळा तालुक्यात ६ अशा ६८ गावांमध्ये ५५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय टँकर तर ४५ खाजगी टँकरचा समावेश आहे. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अमळनेर, जळगाव व जामनेर तालुक्यातील टँकर कमी होण्याची शक्यता आहे.