शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

उमेदवारांना फेर मुलाखतीची प्रतीक्षाच पोलीसपाटील भरती : जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: August 10, 2016 23:25 IST

नाशिक : पोलीसपाटील भरतीत गुणवत्ता असतानाही डावलल्या गेलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय देण्याचे घोंगडे जिल्हाधिकार्‍यांवर झटकून मोकळे झालेल्या प्रांत अधिकार्‍यांच्या अहवालावर महिना उलटूनही निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनास वेळ मिळालेला नाही, परिणामी आज ना उद्या न्याय मिळेल या आशेवर असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे.

नाशिक : पोलीसपाटील भरतीत गुणवत्ता असतानाही डावलल्या गेलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय देण्याचे घोंगडे जिल्हाधिकार्‍यांवर झटकून मोकळे झालेल्या प्रांत अधिकार्‍यांच्या अहवालावर महिना उलटूनही निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनास वेळ मिळालेला नाही, परिणामी आज ना उद्या न्याय मिळेल या आशेवर असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे. एप्रिल महिन्यात लेखी व मे महिन्यात तोंडी मुलाखती घेण्यात आलेल्या पोलीसपाटील भरतीचे कवित्व तीन महिन्यानंतरही सुरूच असून, या भरतीत सिन्नर व निफाड तालुक्यात झालेल्या गैरप्रकारामुळे ही भरती थेट मुंबई उच्च न्यायालय व मॅटमध्ये गाजली. जिल्हाधिकार्‍यांचे आदेश झुगारून तोंडी परीक्षेत प्रांत अधिकार्‍याने आपल्या मर्जीने गुणदान करून पात्रांना अपात्र ठरविले, तर अपात्र पात्र ठरल्याने मोठा गदारोळ झाला होता. या भरतीबाबत सिन्नर तहसील कार्यालयातील एक कर्मचारी उमेदवारांकडे सरळ सरळ पैशांची मागणी करीत असल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्यामुळे तर अन्यायग्रस्त उमेदवारांकडून केल्या जाणार्‍या भ्रष्टाचाराच्या आरोपांना नुसती पुष्टीच मिळाली नाही, तर जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्नी अगोदर घेतलेली आक्रमक भूमिका गळून पडल्यामुळे सार्‍या प्रकरणात तथ्य असल्याची तक्रार उमेदवारांनी केली होती. आदेश झुगारणार्‍या प्रांत अधिकार्‍याबाबत हतबलता व्यक्त करणार्‍या जिल्हाधिकार्‍यांनी या सार्‍या प्रकारणाबाबत उमेदवारांच्या फेर मौखिक मुलाखती घेण्याची सूचनाही प्रांत अधिकार्‍याने मान्य केली नाही, उलट पक्षी जिल्हाधिकार्‍यांनीच या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात, अशी सूचना गेल्या महिन्यात केली. त्यामुळे जिल्हाधिकारी तरी न्याय देतील, अशा आशेवर असलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, परंतु महिना उलटला पण जिल्हाधिकार्‍यांनाही त्याकडे बघण्यासाठी वेळ मिळाला नाही. दोन दिवसांपूर्वीच काही उमेदवारांनी प्रशासनातील अधिकार्‍यांची भेट घेऊन विचारणा केली असता अजून वेळ आहे, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. चौकट===नऊ उमेदवार मॅटमध्येजिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागूनही मिळत नसल्याचे पाहून निफाड व सिन्नर तालुक्यातील नऊ उमेदवारांनी अखेर मॅटकडे धाव घेतली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाची सारी कागदपत्रे गोळा करून या उमेदवारांनी मॅटला प्राथमिक पातळीवर बाजू पटवून दिली आहे. त्याची सुनावणी सुरू असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.