शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

...अशी ओळखा 2000ची नोट !

By admin | Updated: November 16, 2016 22:05 IST

आरबीआयनं या 2000च्या नोटेवर सिक्युरिटी फिचरही दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली -  500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर सरकारनं 500 आणि 2000च्या नव्या नोटा आणल्या आहेत. त्यातील 2000च्या नोटा बँकांमध्येही उपलब्ध झाल्या आहेत. मात्र 2000च्या बाजारात आलेल्या नोटा बनावट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच आरबीआयनं या 2000च्या नोटेवर सिक्युरिटी फिचरही दिलं आहे.दरम्यान, या नव्या नोटेवर एक असे फिचर दिलं ज्याची चर्चा फार झाली नसल्यानं अनेकांना ते माहीत नाही. 2000च्या नोटेचं बारकाईनं निरीक्षण केल्यास तुम्हाला हे फिचर दिसेल. जर तुमच्याकडे 2000च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा. नव्या नोटेवरील गांधीजींच्या या फोटोत त्यांच्या चष्म्यावर आरबीआय असे बारीक अक्षरात लिहिले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात सुरक्षित फिचर असल्याचा दावा 'आरबीआय'नं केला आहे. हे फिचर कॉपी करणेही कठीण असल्याचे सांगितले जात आहे. - अशी आहे २००० रुपयांची नोट- नोट हजारच्या नोटेपेक्षा छोटी आहे. दोन हजारच्या नोटेचा आकार १६६ ६६ मिमी आहे. तर जुन्या एक हजारच्या नोटेचा आकार १७७ ७३ मिमी होता. नोटेवर देवनागरी लिपीमध्येही २००० अशी संख्या देण्यात आली आहे. नोटेचा नंबर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाईपर्यंत मोठा होत जातो. प्रत्येक नंबरचा आकार बदलत जाणार असल्याने अशीच बनावट नोट तयार करणे अवघड जाणार आहे. नोट थोडी तिरपी केली की अनेक ठिकाणी २००० अशी संख्या दिसते.- उजव्या बाजूला हिरव्या रंगात असलेली २००० ही संख्या नोट थोडी तिरपी केल्यानंतर निळ्या रंगाची दिसते. अशाच प्रकारे 'भारत' आणि 'आरबीआय' असेही रंग बदलणारी अक्षरे आहेत. अशोकस्तंभाचे चित्र डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला दिले आहे. - २००० असा आकडा डाव्या बाजूला खाली घेण्यात आला आहे. - याआधीच्या सर्व चलनाच्या नोटांमध्ये महात्मा गांधी यांचे चित्र उजव्या बाजूला होते. ते आता मध्यभागी घेण्यात आले आहे.- गांधीजींच्या चित्राच्या बाजूला दोन भाषांमध्ये रिझर्व्ह बँकेचा संदेश आणि गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. हे अगोदर नोटेच्या खालच्या बाजूला असायचे.- तर मागच्या बाजूला नोट छापली गेली त्या वर्षाचा उल्लेख डाव्या बाजूला करण्यात आला आहे.- तीन ठिकाणी वेगवेगळ्या आकारांत नोटेचे मूल्य छापण्यात आले आहे. - शिवाय इंग्रजीमध्येही two thousand rupees असे लिहिण्यात आले आहे.- स्वच्छ भारतचा लोगो समाविष्ट करण्यात आला आहे.- हत्ती, मोर, कमळ ही राष्ट्रीय चिन्हे आहेत. हत्ती हा राष्ट्रीय वारसा वन्यप्राणी, मोर राष्ट्रीय पक्षी तर कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. - चौदा भाषांमध्ये 'दोन हजार रुपये' असे लिहिलेले आहे.- मोठ्या आकारात मंगळ यानाचे चित्र आहे.