शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयाला मिळाली कष्टांची पावती !

By admin | Updated: July 12, 2017 00:24 IST

जोयिता मोंडल यांनी आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी केलेल्या कष्टांना राष्ट्रीय पातळीवर पावती मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) जोयिता मोंडल यांनी आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी केलेल्या कष्टांना राष्ट्रीय पातळीवर पावती मिळाली आहे. उत्तर दिनाजपूर, इस्लामपूर न्यायालयात जोयिता मोंडल शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ‘विद्वान न्यायाधीश’ म्हणून उपस्थित होत्या. तृतीयपंथी समाजाला भेदभावाची वागणूक मिळत असल्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदोत्सव असा नाही. जोयिता मोंडल यांना मिळालेली ही संधी त्यांच्यासाठी मोठी स्वागतार्ह घटना ठरली. मोंडल यांना त्यांच्या तृतीयपंथी असण्यामुळे जगण्यासाठी भीक मागावी लागली होती. २०१० मध्ये जोयिता यांना ते तृतीयपंथी असल्यामुळे हॉटेलमध्ये राहू दिले गेले नव्हते त्या अपमानापासून त्यांनी आपल्यासारख्याच असलेल्यांच्या कल्याणासाठी काम करायचे ठरवले. मग त्या सामाजिक कार्यकर्त्या झाल्या. त्या नात्याने राष्ट्रीय लोक अदालतवर त्यांच्या झालेल्या निवडीने जोयितांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आणि परिस्थितीवर त्यांनी विजय मिळवला. या नियुक्तीने आम्हाला आनंद झाला, असे ट्रान्स वेल्फेअर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट ट्रस्टच्या संस्थापक अभिना आहेर यांनी सांगितले. तृतीयपंथी समाजातून लोक अदालतवर काम करण्याची संधी मिळालेल्या जोयिता या पहिल्याच आहेत. हे केवळ सक्षमीकरण नसून व्यवस्थेत सहभागी होऊन काही बदल घडवून आणण्यासाठी अधिकार प्राप्त करणे होय, असे अभिना आहेर म्हणाल्या. हॉटेलने नाकारल्यावर जोयिता ज्या बसस्टँडवर झोपल्या होत्या. त्या ठिकाणाहून हे न्यायालय पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. जोयिता यांनी दिनाजपूर नूतन आलो सोसायटी स्थापन करून समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण त्यांच्या मित्रपरिवाराला आहे. लोक अदालतच्या खंडपीठात जोयिता अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि वकिलासोबत बसल्या होत्या. > पक्षपातींना संदेशजोयिता मोंडल म्हणाल्या की, नियुक्तीमुळे मला खूप आनंद झाला आहे. हा मैलाचा दगड ठरला असून त्यामुळे तृतीयपंथी समाजाला पक्षपाती वागवणाऱ्यांना कडक संदेश दिला गेला आहे.