शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

मोहाडी रस्त्यावर पुन्हा घरफोडी

By admin | Updated: September 26, 2016 00:37 IST

जळगाव: मोहाडी रस्त्यावर असलेल्या विनोबा नगरातील स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेत चोरट्यांनी रमेश भारतीया यांच्या मालकीचे बंद घराचा दरवाजा तोडून ऐवज लुटून नेला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली. घरमालक पुणे येथे गेलेले असल्याने नेमका काय ऐवज चोरी गेला हे कळू शकले नाही. घरमालक आल्यावरच मुद्देमालाचा उलगडा होईल. याप्रकरणी सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही.

जळगाव: मोहाडी रस्त्यावर असलेल्या विनोबा नगरातील स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेत चोरट्यांनी रमेश भारतीया यांच्या मालकीचे बंद घराचा दरवाजा तोडून ऐवज लुटून नेला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली. घरमालक पुणे येथे गेलेले असल्याने नेमका काय ऐवज चोरी गेला हे कळू शकले नाही. घरमालक आल्यावरच मुद्देमालाचा उलगडा होईल. याप्रकरणी सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही.
अनंत चतुर्थदशीच्या दिवशी याच रस्त्यावर सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असताना गणपती विसर्जनासाठी आल्याची सांगून दोन चोरट्यांनी हेंमत चुडामन पाटील (वय ३६, रा.बालाजी हाईट्स) यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपये रोख व ६० हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र असा दोन लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली होती. या दहा दिवसातील ही दुसरी घटना आहे.
घरमालक मुलांकडे गेले पुण्याला
रमेश भारतीया हे सोसायटीतील ३१ क्रमांकाच्या प्लॉटमध्ये पत्नीसह वास्तव्याला आहेत. त्यांची मुले पुणे येथे स्थायिक असल्याने ते पंधरा दिवसापूर्वीच त्यांच्याकडे गेले आहे. घर सतत बंद असल्याचे हेरुन चोरट्यांनी घरात हातसाफ केला आहे. मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. घरात साफसफाईसाठी आलेल्या कर्मचार्‍याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याने शेजारच्यांना ही माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही पाहणी केली. घरात सामान तसेच कपाटाची नासधूस करण्यात आली आहे.

मागील घटनेत वृध्देने टोकले होते चोरट्यांना
अनंत चतुर्थदशीच्या दिवशी झालेल्या घरफोडीच्या वेळी बालाजी हाईटस या अपार्टमेंटमध्ये वॉचमन डिंगबर यांच्या सासू पार्वताबाई मुरुम यांनी चोरट्यांना तुम्ही कोण व कुठे चाललात असे विचारले असता त्यांनी येथे आमचे नातेवाईक आहेत आम्ही गणपती विसर्जनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते. या इमारतीत सध्या कोणीच नाही सर्व जण विसर्जनालाच गेले आहेत असे सांगितले असता दोघं जण परत जाण्याचा बहाणा करुन कोपर्‍यात गेले. वृध्देचे लक्ष विचलित करुन ते इमारतीत चढले होते. ही घटनाही त्याच दिवशी घडली असावी अशीही शक्यता आहे.