शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘आप’मध्ये बंडाळी; संघर्ष शिगेला

By admin | Updated: March 26, 2015 01:14 IST

एका गटाने समांतर बैठक बोलावत पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना शह दिल्याने अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक २८ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असतानाच एका गटाने समांतर बैठक बोलावत पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना शह दिल्याने अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीचे पंजाबमधील सदस्य अशोक तलवार यांनी केजरीवालांना पत्र पाठवून समांतर बैठकीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.हितस्वारस्य असलेल्यांनी ‘स्वराज’ आणि अंतर्गत लोकशाहीच्या नावावर बोलावलेली सदर बैठक हा खोलवर रचलेल्या कटाचा भाग असून त्यामागे पक्षाला अस्थिर करण्याचा डाव आहे, असे तलवार यांनी या पत्रात नमूद केले. आपचे नेते शांतीभूषण यांनी असंतुष्टांची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली असताना त्यांनी मात्र अशा वृत्ताचा इन्कार केला आहे.२७ मार्च रोजी होणाऱ्या समांतर बैठकीला येण्यासाठी मला दिल्लीतील वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून वारंवार कॉल करण्यात आले व संदेशही पाठविण्यात आल्याचा दावा तलवार यांनी केला आहे. मला स्वराजसंबंधी बैठकीवर चर्चा करणे आवश्यक असल्याचा संदेश पाठविण्यात आल्यानंतर वारंवार फोन करून माझ्या हजेरीची खातरजमा केली जात होती. १२४ सदस्यांनी हजर राहणार असल्याचे कबूल केले.असून त्यानुसार आम्हाला वास्तव्याची आणि भोजनाची व्यवस्था करावी लागणार असल्याचे मला फोनवर सांगण्यात आले, अशी माहितीही तलवार यांनी दिली. अनेकांनी त्याबाबत माहिती दिली आहे. २८ मार्च रोजी बैठकीत तुम्ही हा मुद्दा उपस्थित करू शकता, असे मी त्यांना कळविले असल्याचे आपचे ज्येष्ठ नेते आशुतोष यांनी नमूद केले. केजरीवाल पुन्हा सुरू करणार जनता दरबारमुख्यमंत्री केजरीवाल पुढील आठवड्यापासून सिव्हिल लाईन्स येथील आपल्या सरकारी निवासस्थानी ‘जनता दरबार’ भरविणार आहेत. याआधी केजरीवालांनी कौशंबी येथील निवासस्थानी १८ फेब्रुवारीनंतर दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी जनता दरबार भरविला आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने त्यांना गेल्या बुधवारी लोकांना भेटता आले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत काही कार्यकर्ते आणि अधिकारी तक्रारी स्वीकारतील. ——————-लवकरच गृहप्रवेशचैत्रापासून सुरू झालेल्या नवरात्रीच्या काळात केजरीवाल सिव्हिल लाईन्समधील सहा फ्लॅगस्टाफ रोडवरील चार खोल्यांच्या निवासस्थानी वास्तव्याला जातील. तेथे चार बेडरुम, दोन लॉन, ड्रॉर्इंग आणि डायनिंग एरिया तसेच कर्मचाऱ्यांचे दोन क्वार्टर्स आहेत. केजरीवालांनी एकूण १६ जनता दरबार घेतले असून त्यांच्याकडे १० हजारावर निवेदने पोहोचविण्यात आल्याचा दावा पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे.४पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी क्षुद्र राजकारण केल्यास पक्ष भूतकाळात गडप होईल. जनतेच्या आशा-आकांक्षेचा विश्वासघात करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही, असे सांगत आपचे खासदार धर्मवीर गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ४तत्त्वे आणि व्यावहारिकतेचे योग्य संतुलन राखले तरच पक्ष भविष्यात निर्णायक भूमिका बजावू शकेल. कार्यकर्त्यांनी केवळ समर्थक बनून राहू नये. सर्व नेत्यांना मग तो कितीही मोठा असो अथवा तळागाळातील कार्यकर्ता असो, जनतेचा विश्वासघात करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असा इशारा मी देऊ इच्छितो, असेही ते म्हणाले.