शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरेच ‘हेवीवेट’ शहांचे वजन मोजणार !

By admin | Updated: September 3, 2015 01:00 IST

भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे २१ आॅगस्ट रोजी पाटण्यातील शासकीय अतिथीगृहाच्या लिफ्टमध्ये अडकल्यानंतर राजकीय कटकारस्थानाचा आरोप झाल्याचे पाहता या प्रकरणाची आयोगाने चौकशी सुरू केली

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे २१ आॅगस्ट रोजी पाटण्यातील शासकीय अतिथीगृहाच्या लिफ्टमध्ये अडकल्यानंतर राजकीय कटकारस्थानाचा आरोप झाल्याचे पाहता या प्रकरणाची आयोगाने चौकशी सुरू केली असून शासकीय अतिथीगृहातील लिफ्ट ओव्हरलोड झाली काय? हे तपासण्यासाठी शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खरेच वजनकाट्यावर उभे राहण्याची वेळ येऊ शकते. लोकसभा निवडणुकीत भाजपची प्रचारधुरा सांभाळणाऱ्यांपैकी एक असलेल्या शहा यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडली. त्यांचे राजकीय वजन वाढून शासकीय यंत्रणाही त्यांच्या तालावर हलू लागली, मात्र पाटण्यात लिफ्ट अडकून पडल्याने शहा यांची झालेली पंचाईत भाजपच्या जिव्हारी लागली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी जाडजूड शहा यांचे वजन जास्त असल्यामुळेच लिफ्ट अडकल्याचे सांगत चांगलीच टर उडविली. त्यावर प्रतिक्रियाही झडल्या मात्र बिहार सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी आयोग नेमला आहे. त्यामुळे शहा आणि त्यांच्यासोबतचे भाजपचे तीन नेते आणि सुरक्षा अधिकाऱ्याला वजन मोजण्याच्या मशीनवर उभे करीत त्यांचे अधिकृतरीत्या वजन मोजले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. शहा यांच्यासोबत भुपेंदर यादव, सौदन सिंग, नागेंद्र आणि एक सुरक्षा अधिकारी होता. सीआरपीएफच्या जवानांना अखेर लिफ्टचे दार तोडून या सर्वांना बाहेर काढावे लागले, यात सुमारे ४० मिनिटांचा वेळ गेला. शहा यांच्यासह लिफ्टमध्ये अडकलेल्यांना आणि लिफ्टची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयोग पाचारण करू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)