शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा ओळखण्यासाठी RBI देणार BSF जवानांना ट्रेनिंग

By admin | Updated: February 12, 2017 15:52 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(बीएसएफ)च्या जवानांना बनावट नोटा ओळखण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 12 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(बीएसएफ)च्या जवानांना बनावट नोटा ओळखण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान होणा-या बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरापासून सीमेवर 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा लागोपाठ जप्त करण्यात आल्या असून, सुरक्षा एजन्सी आणि गुप्तचर विभागाची झोप उडाली आहे. सुरक्षा एजन्सीनं पकडलेल्या बनावट नोटांची संख्या चिंताजनक आहे. 2 हजारांच्या अर्ध्याहून अधिक बनावट नोटांवर सिक्युरिटी फिचर्सला कॉपी करण्यात आलं आहे. त्यामुळेच आरबीयआनं जवानांना 2000च्या ख-या नोटा ओळखण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.जवान आणि अधिका-यांनी ख-या नोटा ओळखणं गरजेचं आहे. 2 हजारच्या नव्या नोटेवर 17 सिक्युरिटी फिचर्स आहेत. त्यामुळे बनावट नोटा लवकरात लवकर ओळखल्या जाव्यात. नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवरील माल्दा आणि मुर्शिदाबादेत बनावट नोटांची तस्करी कमी झाली आहे. मात्र 2000च्या बनावट नोटा सापडू लागल्यापासून चिंतेत वाढ झाली आहे. माल्दा जिल्ह्याजवळील केंद्रीय आणि राज्य पोलिसांच्या एजन्सीनं डिसेंबर 2016 आणि जानेवारीदरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 8 फेब्रुवारीला पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणाकडून 2 हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा जप्त करून त्याला अटक केली. 2 हजारच्या जप्त करण्यात आलेल्या नोटांवर वॉटरमार्कसह फीचर्स कॉपी करण्यात आले आहेत. त्यामुळे या नोटा ओळखणं अवघड जातं असल्याचंही बीएसएफच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे.