रेमंड कंपनीचे कामकाज पूर्ववत
By admin | Updated: February 7, 2016 22:46 IST
जळगाव- रेमंड कंपनीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, कामगारांना सु्या वाढवून देण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य केला आहे. परंतु महागाई भत्त्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ स्तरावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार प्रतिनिधींना दिले.
रेमंड कंपनीचे कामकाज पूर्ववत
जळगाव- रेमंड कंपनीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, कामगारांना सु्या वाढवून देण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य केला आहे. परंतु महागाई भत्त्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ स्तरावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार प्रतिनिधींना दिले. महागाई भत्ता मिळावा आणि सीएल व पीएल सु्या वाढवाव्यात या मागणीसाठी कामगारांनी शनिवारी दुपारी ३ वाजेपासून बंद सुरू केला होता. यामुळे कापड निर्मिती ठप्प झाली. रात्री निघाला तोडगाकामगारांनी बंद पुकारल्यानंतर खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे संघटक ललित कोल्हे यांनी कंपनीत जाऊन व्यवस्थापन व कामगार यांच्याशी चर्चा सुरू केली. कंपनीचे जळगाव प्रकल्प प्रमुख संजय शरण हे रात्री ११ वाजेनंतर दाखल झाले. यानंतर कोल्हे, शरण व मानव संसाधन विभागाचे प्रमुख शिवाजी दाभाडे यांच्यात चर्चा झाली. करार झाल्याने आता भत्ता मिळणार नाहीमहागाई भत्ता २०१७ नंतर द्यावा, असा करार झाला आहे. कामगारांनी त्यावर स्वाक्षर्या केल्या आहेत. आता भत्ता देणे शक्य नाही. पण याबाबत कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्टीकरण व्यवस्थापनातील प्रतिनिधींनी दिले. चार-चार सु्या वाढविल्याकामगारांना सात सीएल व १६ पीएल सु्या दिल्या होत्या. त्यात वाढ करण्यात आली. आता कामगारांना ११ सीएल व २० पीएल सु्या मिळतील, असे व्यवस्थापनाने सांगितले. कामकाज सुरूसु्या वाढवून मिळाल्यानंतर व महागाई भत्त्यासंबंधी नियमांना अधीन राहून मार्ग काढण्यासंबंधी निर्णय झाल्यानंतर कामगारांनी कामकाज सुरू केले. रात्री ११.३० वाजता कामकाज सुरू झाले, असा दावा कामगार प्रतिनिधींनी केला. कोट-रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाशी रात्री उशीरापर्यंत बोलणी सुरू होती. सु्यांचा प्रश्न निकाली काढला आता महागाई भत्त्यासंबंधी नियम, करारातील अटी या सर्व बाबींना अधीन राहून काय योग्य मार्ग निघेल याबाबत व्यवस्थापनाने आश्वासन दिले आहे. -ललित कोल्हे, संघटक, खान्देश कामगार उत्कर्ष संघटना