शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र गायकवाडांवरील विमानबंदी अखेर उठली

By admin | Updated: April 8, 2017 05:42 IST

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी एअर इंडियाने तत्काळ प्रभावाने हटवली

सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी एअर इंडियाने तत्काळ प्रभावाने हटवली असून, अन्य एअरलाइन्सही आता बंदी लगेच मागे घेतील. खा. गायकवाडांनी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना एक पत्र पाठवून झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. एअर इंडियाच्या संबंधित कर्मचाऱ्याची आपण माफी मागणार नाही, अशा ठाम भूमिकेवर अडून बसलेल्या गायकवाडांनी हवाई वाहतूकमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात काय घडले, ते बाहेर येईलच व त्यातून दोषीवर जबाबदारीही निश्चित केली जाईल. तथापि, अशा घटनेची भविष्यात संभाव्य पुनरावृत्ती होईल, या नजरेने सदर प्रकरणाकडे पाहिले जाऊ नये. विमानबंदीमुळे मला संसद सदस्य या नात्याने माझी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडणे अवघड झाले आहे. सबब ही बंदी उठवण्याची मी विनंती करतो.> नवा गोंधळहा वाद संपतो, तोच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार श्रीमती डोला सेन यांच्या विमानप्रवासामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. त्यांच्या मातोश्री सध्या व्हीलचेअरवर आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक रक्कम भरून जिथे पाय लांब करण्यास अधिक जागा आहे, अशा सीटची व्यवस्था करण्यास खा. सेन यांनी सांगितले होते. त्यांना आपत्कालीन दरवाजापाशीची जागा देण्यात आली. पण त्यांनी सोबतची व्यक्ती व्हीलचेअरवर असल्याचे सांगितले नव्हते. त्यामुळे विमानात त्या आल्यानंतर गोंधळ झाला, असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.