शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

खुशखबर... आता शहर किंवा राज्य बदललं तरी रेशन कार्ड बदलायची गरज नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 07:18 IST

नवी दिल्ली : मोबाइल फोनचा नंबर न बदलता कंपनी ज्याप्रमाणे बदलता (पोर्टेबिलिटी) येते, त्याप्रमाणे यापुढे तुमचे रेशन कार्डही देशातील कोणत्याही शिधावाटप दुकानांत चालू शकेल. त्यासाठी एका राज्यातून वा शहरातून दुसरीकडे गेल्यावर आधीचे कार्ड रद्द करून नव्या ठिकाणी नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.  हे शक्य करण्यासाठी सरकार सार्वजनिक वितरणप्रणाली एकीकृत व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) सध्या काम करीत आहे.

ठळक मुद्देनव्या कार्डाची गरज नाही

नितीन अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोबाइल फोनचा नंबर न बदलता कंपनी ज्याप्रमाणे बदलता (पोर्टेबिलिटी) येते, त्याप्रमाणे यापुढे तुमचे रेशन कार्डही देशातील कोणत्याही शिधावाटप दुकानांत चालू शकेल. त्यासाठी एका राज्यातून वा शहरातून दुसरीकडे गेल्यावर आधीचे कार्ड रद्द करून नव्या ठिकाणी नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.  हे शक्य करण्यासाठी सरकार सार्वजनिक वितरणप्रणाली एकीकृत व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) सध्या काम करीत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक व तेलंगणासह काही राज्यांत ही पद्धत अंशत: लागू आहे. अन्न व सार्वजनिक पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार आयएम-पीडीएस नावाची ही योजना २0१८-२0१९ आणि २0१९-२0२0 या काळात लागू होईल व त्यासाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च होईल. देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल. याअन्वये सार्वजनिक वितरणप्रणाली राज्यांच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचेही काम केले जाईल. याशिवाय पीडीएससाठी वेब आणि मोबाइल अँप्लिकेशनदेखील तयार केले जाईल. पासवान लोकसभेत म्हणाले की, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये रेशन कार्डची पोर्टेबिलिटी लागू केली गेली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणामध्ये ही व्यवस्था अंशत: उपलब्ध आहे.

कुठेही घ्या रेशनतुमच्याकडे महाराष्ट्रातील रेशन कार्ड असेल आणि तुमची दिल्ली व अन्य राज्यात राहावयास गेल्यास तेच कार्ड तेथील दुकानांमध्ये चालेल. म्हणजे असलेल्या कार्डावरच तुम्हाला रेशन मिळू शकेल. त्यासाठी येथील कार्ड रद्द करून, नव्या ठिकाणी पुन्हा कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.