शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

महिलेवर बलात्कार; २ अधिका-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:53 AM

कर्मचारी महिलेवर (२८) बलात्कार केल्याच्या आरोपावरून खासगी कंपनीच्या २ वरिष्ठ कार्यकारी अधिकाºयांना १८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून

विशाखापट्टणम : कर्मचारी महिलेवर (२८) बलात्कार केल्याच्या आरोपावरून खासगी कंपनीच्या २ वरिष्ठ कार्यकारी अधिकाºयांना १८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून, त्यात दिलीप पिंटो (५५) या श्रीलंकेच्या नागरिकाचा समावेश आहे.पिंटो हा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक असून, दुसºया वरिष्ठ कार्यकारी अधिकाºयाचे नाव मल्ला श्याम सुंदर (३०) आहे. ही माहिती पोलीस उपअधीक्षक (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शाखा) सी. विवेकानंद यांनी दिली. पीडित महिला झारखंडमधील आदिवासी असून, अच्युतपूरममध्ये असलेल्या पॅकेजिंग कंपनीत ती कनिष्ठ पातळीवर कामाला होती व मलकापूरममध्ये राहते. पिंटो व सुंदर यांनी गेल्या काही महिन्यांत तिच्यावर अनेक वेळा स्वतंत्रपणे लैंगिक अत्याचार केले, असे विवेकानंद म्हणाले.नंतर या महिलेला बढती दिली गेली आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिला कामगिरी ‘असमाधानकारक’ असल्याच्या कारणावरून काढून टाकले. गेल्या महिन्यात पीडितेने पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांच्याकडे दिलेली तक्रार त्यांनी तपासासाठी विवेकानंद यांच्याकडे पाठविली. पिंटो व सुंदर यांनी या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. दोन्ही आरोपींना बलात्कार व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली अटक केली.तरुणीवर अत्याचारनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये २ पुरुषांनी तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात धातूची वस्तू घुसविली, असे पोलिसांनी सांगितले. दोघांनाही अटक झाली आहे. दक्षिण दिनाजपूरमधील खेड्यात ही पीडिता पुलाखाली आढळली. ती १८ तास बेशुद्धावस्थेत पडून होती व तिच्या गुप्तांगातून आतडे बाहेर पडत होते. तिच्यावर मालदा रुग्णालयात २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.