शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारपीडित मुलीला पिता उपचारासाठी रोज कडेवर नेतो

By admin | Updated: August 30, 2015 00:33 IST

झारखंडच्या एका छोट्या गावात मजुरी करणारी व्यक्ती दररोज ९ वर्षांच्या आपल्या बलात्कारपीडित मुलीला कडेवर घेऊन जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेतो.

घाटसिला : झारखंडच्या एका छोट्या गावात मजुरी करणारी व्यक्ती दररोज ९ वर्षांच्या आपल्या बलात्कारपीडित मुलीला कडेवर घेऊन जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेतो. त्याच्याकडे सायकल घेण्यासाठी पैसे नाहीत; मात्र पैसे नाहीत म्हणून तो मुलीच्या उपचारात अजिबात खंड पडू देत नाही. पाऊस, ऊन किंवा वारा कोणीही त्याचा मार्ग अडवू शकत नाही. दोन महिन्यांपूर्वी स्थानिक ड्रायव्हरने चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिला नदीच्या किनारी फेकून दिले. बलात्कारामुळे तिच्या आतड्याला गंभीर इजा झाली. शरीर व आतड्यातून रक्तस्राव होत होता. ती ना चालू शकत होती ना उभी राहू शकत होती. मोठ्या मुश्लिकीने घरी पोहोचून तिने आई-वडिलांना घटना सांगितली. तिला लगेच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला जमशेदपूर येथे हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनाही तिचा रक्तस्राव थांबविता न आल्यामुळे अखेरीस तिला रांची येथील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या आतड्याची भयंकर अवस्था लक्षात घेऊन कोलेक्टॉमी आॅपरेशन केले आणि तिचे क्षतिग्रस्त आतडे हटवून तेथे कोलोस्टॉमी बॅग लावली. शस्त्रक्रिया यशस्वी होऊन रक्तस्राव बंद झाला व मुलीला रुग्णालयातून सुटी दिली. आता घरी राहूनच रोज तिच्या जखमेची ड्रेसिंग करायची आहे. मुलीचे वडील म्हणाले, माझ्याकडे सायकल किंवा मोटरसायकल नसली म्हणून काय झाले. ती माझी मुलगी आहे. मी तिला टाकून देऊ शकत नाही. तिने लवकरात लवकर बरे व्हावे, असे आम्हाला वाटते. यासाठी मला तिला रोज डॉक्टरकडे न्यावे लागेल. मुलीचे वडील प्रचंड गरीब आहेत; मात्र त्यांचे धैर्य दाद द्यावे असे आहे. हटियापाटा या गावचा पिता दररोज मुलीला कडेवर घेऊन चार कि.मी. चालत डॉक्टरकडे जातो. तेथे मुलीची ड्रेसिंग केली जाते. माओवादग्रस्त या भागात वाहतुकीची सुविधा नसल्यातच जमा आहे. सायकल खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे ते देखील या कुटुंबाकडे नाहीत. पाऊस असो, तळपते ऊन असो हा पिता डॉक्टरकडे जाण्याचा नित्यनेम मोडत नाही. (वृत्तसंस्था)मुलीसाठी आणखी काहीही सोसण्याची तयारी...मुलीच्या उपचारामुळे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. मुलीला दररोज डॉक्टरकडे न्यावे लागते, त्यामुळे मजुरीवर जाण्यासाठी वेळ मिळत नाही. या कुटुंबाने आपली गुरे विकून त्या पैशाने मुलीसाठी नवे कपडे आणि भेटवस्तू आणल्या. उद्देश एकच मुलीला खुश ठेवायचे. तिला बरे झाल्याचे पाहण्यासाठी हे कुटुंब स्वत:ला गहाणही ठेवू शकते. मुलीच्या वडिलाने पत्रकाराला सांगितले की, मी कामावर जाऊ शकत नाही. सध्या माझी मुलगी माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची बाब आहे. आमच्याकडे होते नव्हते ते सगळे संपले आहे. आता आमच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे; मात्र मुलीसाठी आणखी कितीही सोसण्याची आमची तयारी आहे.