शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने कापून टाकलं बलात्कारी साधूचं गुप्तांग

By admin | Updated: May 20, 2017 15:50 IST

गेली कित्येक वर्ष बलात्कार करत लैंगिक शोषण करणा-या साधूचं 23 वर्षीय तरुणीने गुप्तांग कापून टाकल्याची घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. 20 - गेली कित्येक वर्ष बलात्कार करत लैंगिक शोषण करणा-या साधूचं 23 वर्षीय तरुणीने गुप्तांग कापून टाकल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी पीडित तरुणी लहान म्हणजेच शाळेत असल्यापासून तिच्यावर बलात्कार करत होता. या भयाण परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्याच्या हेतूने तरुणीने अखेर आपल्यावर बलात्कार करणा-या या साधूचं गुप्तांगच कापून टाकलं. 
 
यानंतर तरुणीने स्वत: पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. सुडापोटी आपण हे केलं असून स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं असल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली आहे. पीडित तरुणीचे पालक या स्वामीचे भक्त होते. कोल्लम येथील एका आश्रमात या साधूचं वास्तव्य होतं. 
 
स्वामीची परिस्थिती सध्या नाजूक असून त्याला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 
"एक साधू आपल्यावर बलात्कार करत असल्याचं मी सांगितलं असतं तर कुणीच विश्वास ठेवला नसता. त्यामुळेच हे पाऊल उचलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्यासमोर नव्हता", असं पीडित तरुणीने सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईला स्वामीच्या या अश्लील चाळ्यांची कल्पना होती. मात्र तरीही ती गप्प राहिली आणि स्वामीला आपलं लैंगिक शोषण करुन देत होता. अनेकदा स्वामी घरी येऊन बलात्कार करत असे. शुक्रवारी स्वामी येणार असल्याची माहिती असल्याने पीडित तरुणीने आधीच तयारी करत गुप्तांग कापण्याच्या हेतूने चाकू जवळ ठेवला होता.
 
पोलिसांनी स्वामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच पीडित तरुणीवर अत्याचार सुरु झाला तेव्हा ती अल्पवयीन होती त्यामुळे बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.