शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

जेलबाहेर आणून बलात्काऱ्याची हत्या

By admin | Updated: March 7, 2015 02:05 IST

संतप्त जमावाने बलात्कार प्रकरणातील आरोपीची बदडून हत्या केली़ या वेळी जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये २५ वर्षांच्या एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे.

नागालँडमध्ये जमावाचा हल्ला : पोलीस गोळीबारात १ ठार, २० जखमीगुवाहाटी : नागालँडच्या दीमापूर येथील जिल्हा कारागृहाबाहेर गुरुवारी संतप्त जमावाने बलात्कार प्रकरणातील आरोपीची बदडून हत्या केली़ या वेळी जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये २५ वर्षांच्या एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शुक्रवारी दीमापूर येथे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. बुधवारपासूनच या बलात्काराच्या घटनेविरोधात निदर्शने सुरू आहेत, यामध्ये वाहनांच्या जाळपोळीसारख्या घटनाही घडल्या आहेत.दरम्यान, या सर्व प्रकरणात मध्यवर्ती कारागृहाच्या पोलिस अधिक्षकासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलबिंत केले आहे. सय्यद फरीद खान असे मृत आरोपीचे नाव आहे़ संशयित बांगलादेशी नागरिक असलेला सय्यद हा जुन्या कारचा डीलर होता़ २३ फेबु्रवारीला नागा मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता़ खानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत काल नागा स्टुडंट फेडरेशन आणि नागा महिला संघटनांनी ‘बंद’चे आवाहन केले होते़ दीमापूरमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता़ याउपरही गुरुवारी शेकडो स्थानिकांनी बंगाली भाषिक मुस्लिमांचा व्यापार परवाना रद्द करण्याची मागणी करीत मोर्चा काढला़ यादरम्यान संतप्त निदर्शक बळजबरीने कारागृहात शिरले आणि त्यांनी आरोपी खानचा ताबा घेतला़ त्याला दुचाकीला बांधून फरफटत मुख्य चौकात नेले़ स्थिती नियंत्रणात येईपर्यंत आणि आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता़