शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार

By admin | Updated: August 11, 2016 01:41 IST

अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, तर तिच्या मोठ्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याची घटना हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात घडली.

सोनिपत : अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, तर तिच्या मोठ्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याची घटना हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात घडली. पीडित मुली नववी आणि दहावीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेने गोहाना तालुक्यातील बरोडा मोर हे गाव चर्चेत आले आहे. हा तालुका जातीयवादी हिंसाचारासाठी कुख्यात आहे. दलितांवरील वाढत्या अत्याचारांवरून हरियाणात सातत्याने आंदोलने होत आहेत. जुलैमध्ये रोहतक जिल्ह्यात दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर निदर्शनांना तोंड फुटले होते. बरोडा मोर गावातील घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बरोडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजपाल यांनी सांगितले. तथापि, त्यांनी आरोपींची माहिती देण्यास नकार दिला. आम्ही गुन्हा दाखल केला असून, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत, असे ते म्हणाले. या घटनेबाबत पोलीस अधीक्षक एच. एस. दून व रोहतक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तथापि, संपर्क होऊ शकला नाही. प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते, असा आरोप पीडित मुलींच्या वडिलांनी एका दैनिकाशी बोलताना केला. मी सकाळपासून ठाण्यात असून, रात्री उशिरा एफआयआर दाखल करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. एका दैनिकाने एफआयआरची प्रत मिळवली. एफआयआरनुसार, या प्रकरणी अजय, बलराम आणि प्रदीप यांच्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक छळ आणि धाकदपटशाच्या आरोपांसह पोक्सा कायद्यातील विविध कलमे, तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजय हा आमचा दूरचा नातेवाईक आहे, तर बलराम आणि प्रदीप हे गावातील आहेत, असे पीडित मुलींच्या वडिलांनी सांगितले. (वृत्तसंस्था)