शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरण

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार

सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार
नरामधमास सात वर्षे कारावास
कन्हानच्या मंगल कार्यालयातील घटना
नागपूर : कन्हानच्या रॉयनगर येथील कुलदीप मंगल कार्यालयात एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राकेश ऊर्फ चक्रधर जागोजी बेले (२७) असे आरोपीचे नाव असून तो टेकाडी येथील रहिवासी आहे. ही घटना ३ मे २०१३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली होती. ही दुर्दैवी बालिका आई आणि चुलत भावासह नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. सकाळी ११-११.३० वाजताच्या दरम्यान लग्नसोहळा पार पडला होता. त्यानंतर तिची आई नातेवाईकांसोबत बोलत बसली होती, तर ही बालिका तिच्याच बाजूला खेळत होती. ती १२.३० वाजताच्या सुमारास आईकडे आली आणि त्यानंतर अचानक बेपत्ता होती. १५ मिनिटे झाले तरी मुलगी दिसली नाही म्हणून आईने तिचा शोध घेतला असता ती मंगल कार्यालयाच्या वरच्या माळ्यावरून रडत येताना दिसली.
घटनेच्या वेळी हा नराधम अनोळखी होता. त्याने या बालिकेला आईस्क्रीम खाऊ घालण्याचे आमिष दाखवून मंगल कार्यालयाच्या वरच्या माळ्यावर नेले होते. या ठिकाणी बलात्कार करून तो पसार झाला होता. पीडित बालिकेने घडलेली घटना आपल्या आईला सांगताच संपूर्ण लग्न समारंभातच मोठी खळबळ उडाली होती. लागलीच या घटनेची तक्रार कन्हान पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपूर्ण --