शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘रण’भूमी

By admin | Updated: February 14, 2015 15:15 IST

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पार पडणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी ‘रण’भूमी चांगलीच तापली आहे.

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पार पडणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी ‘रण’भूमी चांगलीच तापली आहे. १४ मैदानांवर होणाऱ्या सामन्यांसाठी आयोजकांनीही चांगलीच कंबर कसली आहेत. या दोन्ही देशांची भौगोलिक परिस्थिती सारखीच असल्याने येथील खेळपट्टी उसळी घेणारी आहेत. विश्वचषकाच्या लढती होणाऱ्या १४ मैदानांचा घेतलेला हा आढावा...सिडनी क्रिकेट ग्राऊंड फिल ह्यूज याच्या निधनामुळे या मैदानाला भावनिक महत्त्व आले आहे. त्यामुळे या मैदानावर आॅस्ट्रेलिया जी लढत खेळेल ती जीवाचे रान करूनच. जवळपास ४४ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या मैदानावर आॅस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका ही लढत वगळता उपांत्यपूर्व आणि उपांत्य या मोठ्या लढती होणार आहेत. हे मैदान केवळ क्रिकेटपूरतेच मर्यादित नसून येथे फुटबॉल आणि रग्बीच्या लढतीही होतात. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या मैदानावर आॅस्ट्रेलियाने ३६८ धावांचा डोंगर उभा करून श्रीलंकेची दाणादाण उडवली होती. आत्तापर्यंत येथे १० वेळा तिनशेहून अधिक धावा एका संघाने कुटल्या आहेत. जलद गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही मधल्या षटकांत मदत मिळू शकते. एक काळ असा होता की शेन वॉर्न याने आपल्या फिरकीच्या बळावर सिडनी मैदान गाजवले होते.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडआॅस्ट्रेलियातील प्रमुख मैदान म्हणून एमसीजीची ओळख आहे. शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या मैदानावर फुटबॉलचे सामनेही खेळविण्यात येतात. जवळपास लाखभर प्रेक्षकांची क्षमता या मैदानाला आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना मदत करणारी एमसीजीची खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी पोषक आहे. मात्र, शेन वॉर्न याने हा अपवाद ठरविला आहे. अनेकदा त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळले आहे. त्यामुळे येथे भारत तीन जलदगती गोलंदाजांसह आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंना घेऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरेल.

अ‍ॅडलेड ओव्हल फुटबॉल, रग्बी, तिरंदाजी, अ‍ॅथलिट्स, बेसबॉल, सायकलिंग, हॉकी आदी विविध खेळ येथे खेळले जात असल्याने ‘मल्टी’ टास्कींग अशा या मैदानाची ओळख आहे. तरीही या सर्वांत क्रिकेट हा येथील प्रसिद्ध खेळ आहे. १८७३मध्ये स्थानिक आणि संघटक यांच्यातील वाद मिटल्यानंतर हे मैदान खेळासाठी खुले करण्यात आले. ५० हून अधिक प्रेक्षकक्षमता या मैदानाची आहे. दोन्ही डावांत फलंदाज खोऱ्याने धावा चोपू शकतील अशी खेळपट्टी अ‍ॅडलेडची आहे. पण, येथे जलदगती गोलंदाजांची चलती आहे. त्यामुळे येथे फिरकीपटू खेळवून संघाला फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे भारताने चार जलदगती गोलंदाजांसह येथे खेळावे.

ईडन पार्क १९२९-३० सालापासून येथे कसोटी क्रिकेट खेळले जात आहे आणि १९५५-५६ मध्ये न्युझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी विजय येथेच साजरा केला होता. मात्र, याच मैदानावर १९५५मध्ये इंग्लंडविरुद्ध अवघ्या २६ धावांत सर्वबाद होण्याची नामुष्की न्युझीलंडवर ओढावली होती. कालांतराने जरी या मैदानात परिवर्तन झाले आहे. येथेही तग धरल्यास खोऱ्याने धावा बनविणे जितके सोपे आहे, तितकेच अचुक मारा केल्यास प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळणेही सहज शक्य आहे. येथे यजमान न्युझीलंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या लढतीची सर्वांना उत्सुकता आहे.

ब्रिसबन क्रिकेट ग्राऊंड ४० हजार प्रेक्षकक्षमता असलेले हे मैदान गॅबा म्हणूनही ओळखले जाते. आॅस्ट्रेलियातील इतर मैदानांप्रमाणे येथील खेळपट्टीही जलदगती गोलंदाजांसाठी पोषक आहे. येथे १९६०-६१ साली आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढत बरोबरीत सुटली होती. फलंदाजांनाही सेट होऊन आपली छाप सोडणे सहज शक्य असल्याने येथेही धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.