रामटेक....
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
रामटेक....
गजानन महाराज प्रकट दिन सोहळारामटेक : शहरात संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा विविध ठिकाणी श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडला. शीतलवाडी येथील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करण्यात आले. छप्पनभोग लावण्यात आले. महानैवेद्य व महाआरती करण्यात आली. अभिनव कलादर्शच्यावतीने भक्तिसंगीताचा कार्यक्रम तसेच रवींद्र केदार महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या गडपायरी परिसरात असलेल्या लोटांगण महाराज मंदिरातही गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात पार पडला. यावेळी भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. श्रीसंत गजानन महाराज रामटेकला आले असता ज्या नेवरेंच्या घरी थांबले होते तेथे दरवर्षीप्रमाणे प्रकट दिन आयोजित करण्यात आला. शेकडो भाविकांनी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत महाप्रसादाचा लाभ घेतला. रामाळेश्वर वॉर्डातील खोलकुटे परिवारातर्फे सामूहिक प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.कळमेश्वरात पालखी यात्राकळमेशवर : श्रीसंत गजानन महाराज उत्सव समितीच्यावतीने गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त शहरात पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले. उत्सवात सचिन काळे महाराज यांच्या गोपालकाल्याचे कीर्तन पार पडले. गजानन महाराज मंदिरातून पालखी यात्रा काढण्यात आली. गण गण गणात बोतेच्या गजरात भाविकांनी श्रींचा जयघोष केला. पालखी यात्रेदरम्यान विविध संस्थांतर्फे पाणी, नाश्ता व बुंदी वाटप करण्यात आले. उत्सवास मधुकर लोखंडे, काशीनाथ चिमूरकर, डॉ. विजय देशमुख, अरविंद बोडखे, अशोक बंड, चंद्रशेखर श्रीखंडे, राघवेंद्र कुरळकर आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)