रामटेक गडमंदिराला धोका, कारणे दाखवा नोटीस
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नागपूर : रामटेक गडमंदिराजवळ १४०० ब्रास मुरुम उत्खननाला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गडमंदिराला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मंदिराचे काळजीवाहक व रामटेक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अवैध उत्खननाला परवानगी दिल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. तसेच, यावर दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिलेले आहेत. मंदिराची दुरवस्था पाहून उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. अमित खोत यांची समान विषयावर दुसरी जनहित याचिका आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड़ श्रीकांत खंडाळकर यांनी बाजू मांडली.