रामटेक... लोकअदालत
By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST
फोटो...
रामटेक... लोकअदालत
फोटो...लोकअदालतीमध्ये २२८ प्रकरणांचा निपटारारामटेक : तालुका विधी समिती व तालुका बार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेलसमोर दिवाणी, फौजदारी व बँक, पतसंस्थांचे दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यातील २२८ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. लोकअदालतीच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. जी. चिमणकर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीश नागपूर एस.एच. ग्वालानी यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधी सेवा समितीचे सचिव तथा खंडविकास अधिकारी एन.पी. वानखडे, तालुका बार संघाचे सचिव महेंद्र येरपुडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एम.एन. नवरे, सदस्य ए.एम. देवळे, ए.जी. अपराजीत, ए.व्ही. गजभिये, पी.बी. बांते, आर.व्ही. गायकवाड, वाय.एस. डोंगरे, जी.आर. मेश्राम, के.आर. गडे, मेघरे, कल्याणकर, के.एम. नवरे आदी उपस्थित होते. प्रसंगी स्टेट बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया आदी बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयातील गोरेगावकर, जी. एस. डोंगरदिवे, लघुलेखक धारकर, मुख्य लिपिक डी.के. ठाकूर, निनावे, काळे, पौनीकर, मुळे, जी.जी. दंडे, पी.एन. बोरकर, यु.एस. देशपांडे, पांडे, लखपती, शेरके, कर्णेवार, बोकडे, बहादुरे, हवनतकर, शितोडे, पाठक, गजभिये, नाकाडे, महाजन, वाघमारे, पाटील, बेसरे आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)