शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्वेदी, गुप्ता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार

By admin | Updated: July 30, 2015 04:33 IST

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) मुख्य दक्षता आयुक्तपदी असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड करणारे भारतीय वनसेवेचे (आयएफएस)अधिकारी संजीव चतुर्वेदी

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) मुख्य दक्षता आयुक्तपदी असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड करणारे भारतीय वनसेवेचे (आयएफएस)अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ‘गुंज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता या दोन भारतीयांना आशिया खंडातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३१ आॅगस्टला फिलिपाईन्सच्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.आशियाचा ‘नोबेल’ म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशन (आरएमएएफ)च्या विश्वस्त बोर्डाने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे एम्सचे विद्यमान उपसचिव संजीव चतुर्वेदी यांची ‘उदयोन्मुख नेतृत्व’ (एमरजेंट लीडरशिप) म्हणून या पुरस्कारासाठी निवड झाली. ‘गुंज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना त्यांच्या समाजकार्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात १९५७ मध्ये झाली होती. फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. प्रमाणपत्र, दिवंगत राष्ट्रपतींची प्रतिमा असलेले पदक आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अलीकडच्या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी, अरुणा रॉय आदी भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. चतुर्वेदी, गुप्ता या भारतीयांशिवाय लाओचे कोम्माली चांथावोंग, फिलिपाईन्सचे लिगाया फर्नांडे अमिलबांग्सा आणि म्यानमारचे क्याऊ थू यांनाही मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)