शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल

By admin | Updated: June 24, 2017 02:55 IST

राष्ट्रपतीपदाचे भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज शुक्रवारी लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात जाऊ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज शुक्रवारी लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात जाऊ न सादर केला आणि त्यामुळे त्यांचा राष्ट्रपती भवनात जाण्याचा मार्ग सुकर झाला. कोविंद यांनी अर्जाचे तीन सेट लोकसभा महासचिवांकडे सादर केले. निवडणूक अर्जाचा चौथा सेट ते २८ जून रोजी सादर करणार आहेत. त्यांच्याविरोधात विरोधकांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार रिंगणात असल्या तरी १७ जुलै रोजी होणारी निवडणूक ही केवळ उपचार असेल. मतदानानंतर तीन दिवसांनी म्हणजे २0 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत २४ जुलै रोजी संपणार आहे.कोविंद यांचा विजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासह जवळपास सर्व केंद्रीय मंत्री, भाजप व रालोआशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हेही रामनाथ कोविंद निवडणूक अर्ज दाखल करताना यांच्यासोबत होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मनोहरलाल खट्टर, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि अण्णा द्रमुकच्या दुसऱ्या गटाचे नेते माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे त्यात होते. अर्ज भरल्यानंतर कोविंद म्हणाले की, मी बिहारचा राज्यपाल झालो, तेव्हाच मी सक्रिय राजकारणापासून दूर झालो होतो. तेव्हाच राजकारणापलीकडील व्यक्ती झालो. राष्ट्रपती म्हणूनही मी राजकारणाशी संबंध नसलेला व्यक्ती म्हणूनच काम करेन आणि माझी राष्ट्रपती म्हणून असलेलीच कर्तव्ये बजावेन. ठाकरेंची अनुपस्थितीकोविंद उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणे टाळणे भाजपाला खटकेल आहे. शिवाय ठाकरेंनी आपला प्रतिनिधी म्हणूनही कोणाला पाठविले नव्हते आणि हीच बाब भाजप नेत्यांना सर्वात जास्त खटकली. एवढेच नाही तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनीही यावेळी संसद संकुलात उपस्थित राहणे टाळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी विमानाने दिल्लीला येणार होते. त्यांनी ठाकरेंना तुम्ही येणार असाल तर माझ्यासोबत येऊ शकता, असे सुचविले होते. चर्चा होऊ न जाऊ देत : मीरा कुमार : राष्ट्रपतीपदासाठी उभे असलेले दोन्ही उमेदवार केवळ दलित आहेत, याकडे महत्त्व न देता, त्यांचे आतापर्यंतचे कार्य, अनुभव आणि प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी जाहीरपणे चर्चा व्हायला हवी, असे आव्हान काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांनी कोविंद यांना दिले.याचा काहीही अर्थ काढू नये. आम्ही कोविंद यांचे नाव सुचविले असून, आम्ही त्यांना मतदान करणार आहोत. कोकणात आमचा आज कार्यक्रम होता आणि सर्व प्रमुख नेते त्यात सहभागी झाले होते. - खा. संजय राऊत, शिवसेनेचे नेते