शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष रमेश अढाऊ यांचे निधन

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष रमेश अढाऊ यांचे निधन

कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष रमेश अढाऊ यांचे निधन
कळमेश्वर : नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते रमेश अढाऊ यांचे मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शेकडो शिवसैनिक व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुली, दोन भाऊ, बहीण असा आप्तपरिवार आहे.
रमेश अढाऊ यांनी सन १९८७ मध्ये कळमेश्वरात शिवसेनेचा प्रथम झेंडा रोवला. त्यानंतर शिवसैनिकांना संघटित करून विदर्भात पहिल्यांदा सेनेचा नगरसेवक निवडून आणला होता. दरम्यानच्या काळात अढाऊ यांनी पालिका राजकारणात मुसंडी मारली. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर त्यांनी एक वर्षाकरिता नगराध्यक्षपद भूषविले. त्यानंतर सन २००२ ते २००७ मध्ये पुन्हा ते नगराध्यक्षपदी होते. सन १९८९ मध्ये कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. परंतु त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी कळमेश्वर कृउबासचे प्रशासक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते ओळखले जात. (तालुका प्रतिनिधी)