शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या मंत्र्यांवर रामदेवबाबांचे टीकास्त्र

By admin | Updated: May 21, 2015 11:18 IST

मोदींचे मंत्री अहंकारी झाले आहेत' अशा शब्दांत योगगुरू रामदेव बाबा यांनी मोदींच्या मंत्र्यांवर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - मोदी सरकारच्या निकटचे मानले जाणारे व काँग्रेसवर टीकास्त्र सोडणारे योगगुरू रामदेव बाबा यांनी आता मात्र यू-टर्न घेऊन मोदींच्याच मंत्र्यावर टीका केली आहे 'मोदींचे मंत्री अहंकारी झाले आहेत' अशी टीका करताना रामदेव बाबा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रामदेव बाबांनी मोदींचे कौतुक केले मात्र त्यांच्या सरकारमधील कांही मंत्र्यांवर ते नाराज दिसले. 'मोदींच्या सरकारमधील मंत्री अंहकारी झाले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांचे नंबर बदलले आहेत, जे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी जनतेच्या संपर्कात राहून त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे. काहीतरी काम केलं पाहिजे, काही काळाने का होईना परत निवडणुका लढवायच्या आहेत हे त्यांनी (मंत्री) लक्षात ठेवले पाहिजे' असे रामदेव बाबा म्हणाले. 
तर दुसरीकडे त्यांनी राहुल गांधी यांचे कौतुके केले. 'राहुल यांनी निष्क्रिय काँग्रेसमध्ये प्राण फुंकले आहेत. पराभवानंतर काही काळ अदृश्य झालेला काँग्रेस पक्ष राहुल यांच्यामुळे पुन्हा (सक्रिय) दिसू लागला आहे. विकास व शेतक-यांच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यात काँग्रेस यशस्वी ठरला आहे. त्यामुले शेतक-यांचा विश्वास जिंकण्यासाठी मोदी सरकारला नव्या योजना आखाव्या लागणार आहेत', असा सल्लाही रामदेव बाबांनी दिला.