शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रामदेव बाबांच्या पतंजलीचा 'डिजीटल' योग ठरतोय नफ्याचा

By darshana.tamboli | Updated: August 3, 2017 12:24 IST

हर्बल प्रोडक्टची निर्मिती करणारी योग गुरू बाबा रामदेव यांची पंतजली आयुर्वेद लिमीटेड ही कंपनी सध्या डिजीटल होते आहे.

ठळक मुद्दे हर्बल प्रोडक्टची निर्मिती करणारी योग गुरू बाबा रामदेव यांची पंतजली आयुर्वेद लिमीटेड ही कंपनी सध्या डिजीटल होते आहे.गुगल आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या सहयोगाने पंतजलीने ऑनलाइन जाहीराती सुरू केल्या आहेत.ऑनलाइन ऑडिअन्सला पतंजलीच्या प्रोडक्ट्सकडे आकर्षित करण्यासाठी पंतजलीने हे नवे प्रयत्न सुरू केले आहेत

मुंबई, दि. 3- हर्बल प्रोडक्टची निर्मिती करणारी योग गुरू बाबा रामदेव यांची पंतजली आयुर्वेद लिमीटेड ही कंपनी सध्या डिजीटल होते आहे.  गुगल आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या सहयोगाने पंतजलीने ऑनलाइन जाहीराती सुरू केल्या आहेत. ऑनलाइन ऑडिअन्सला पतंजलीच्या प्रोडक्ट्सकडे आकर्षित करण्यासाठी पंतजलीने हे नवे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या पेपरमध्ये किंवा टेलिव्हिजवरील जाहीरातीने होणाऱ्या फायद्यापेक्षा ऑनलाइन जाहिरातींचा फायदा कंपनीला जास्त होतो आहे, असं पतंजलीकडून सांगण्यात आलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात आम्ही ऑनलाइन जाहिरातींना सुरूवात केली आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद आम्हाला ऑनलाइन जाहिरातीमुळे मिळाल्याचं पतंजली कंपनीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पाच महिन्यात पतंजली ब्रॅण्डच्या वस्तू नियमीत वापरातील वस्तूंच्या यादीत सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाल्या आहेत. तर ऑनलाइन शॉपिंगमध्ये जास्त मागणी असणाऱ्या वस्तूंच्या यादीत पाचव्या स्थानावर गेलं आहे. पतंजलीच्या वस्तू ऑनलाइन प्रमोट करण्याच्या आधी पतंजलीचे युट्यूबवरील व्हयुज 30 लाख होते पण ऑनलाइन प्रमोशन सुरू झाल्यावर युट्यूबरील व्हयुजची संख्या 15 कोटी इतकी झाली आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुगलवर पतंजलीचे प्रोडक्ट सर्च करणाऱ्यांची संख्या ही अकरा पटीने वाढली आहे  तसंच पतंजलीच्या वस्तू सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनत आहेत. 

ऑनलाइन ऑडिअन्सचा पतंजलीच्या वस्तूंबद्दलचा प्रतिसाद पाहता त्यांची पतंजली या ब्रॅण्डबद्दलची आपुलकी दिसून येते. पंतजली हा ब्रॅण्ड भविष्यातील सगळी आव्हानं पेलायला तयार असून फक्त महानगरातच नाही तर प्रत्येक ठिकाणी पंतजलीच्या वस्तू त्यांचं स्थान  निर्माण करतीस, असं गुगल इंडियाचे इंडस्ट्रीचे डायरेक्टर विकास अग्निहोत्री यांनी सांगितलं.

गुगल व्यतिरिक्त फेसबुकवरही पतंजलीकडून प्रमोशन केलं जातं आहे. फेसबुकमुळे युवकांशी आम्ही चांगलं जोडलं गेल्याचा दावा पतंजलीने केला आहे. कर्नाटक, ओडिशा आणि पंजाबमधील तरूणांकडून 80 टक्के चांगली प्रतिक्रिया आल्याचं पतंजलीच्या मँगोडेटा या डिजीटल एजन्सीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी संतोष कुमार यांनी म्हंटलं आहे. 

कुठलीही जाहिरात ही सर्वसाधारणपणे 30 सेकंदाची असते फेसबुकवर ही जाहीरात सहा सेकंत ठेवल्याने, तसंच पतंजलीच्या वस्तू प्रमोट करताना फेसबुकवर लोकांशी लाईव्ह संवाद साधल्याचा चांगला परिणाम पतंजलीला मिळाल्याचंही कुमार म्हणाले आहेत. युट्यूबवरील 'द पतंजली आयुर्वेद चॅनेल' जुलै 2014मध्ये सुरू झालं होतं त्या युट्यूब चॅनेलचे आता 96 हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत तर फेसबुक पेजचे 3 लाख 86 हजार 709 फॉलोवर्स आहेत. डिजीटल युगात पदार्पणाच्या पाच महिन्यातच पतंजलीने एक महत्त्वपूर्ण परिमाण पाहिली असल्याचं, फेसबुक इंडियाचे ग्राहक आणि मीडियाचे संचालक संदीप भुषण म्हणाले आहेत. 

जे ग्राहकांना पतंजलीच्या वस्तूंबद्दल फारशी माहिती नाही, अशांना वस्तूंची माहिती देण्यासाठी गुगल आणि फेसबुकने खास योजना आखली. दक्षिणेतील राज्यांपासून सुरूवात करत पंतजलीने आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणासाठी लोकांसाठी त्यांच्या जाहीराती स्थानिक भाषेत तयार केल्या आहेत. ऑनलाइन मिळणाऱ्या विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी पतंजलीने              'गो स्वदेशी' नावाचं ऑनलाइन कॅम्पेन सुरू केलं आहे. 

पतंजलीचे कपडेही बाजारात येणारबाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी आता ग्राहकांसाठी कपड्यांचीही निर्मिती करणार आहे. पतंजली समूहाच्या 'स्वदेशी' अंतर्गत कपडे तयार केले जाणार आहेत. महिला-पुरूष तसंच लहान मुलांसाठी पतंजलीकडून कपडे तयार केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत पतंजलीचे हे कपडे बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती समोर येते आहे. पतंजलीकडून बाजारात कपडे आणल्यानंतर एका वर्षात पाच हजार कोटींचा माल विकला जाण्याचं टार्गेट कंपनीने समोर ठेवलं आहे

बाबा रामदेव पुरवणार "पराक्रमी" सुरक्षारक्षकयोगगुरू बाबा रामदेव यांचा पतंजली समूह देशभरात दिवसेंदिवस विस्तारत आहे. योग आणि व्यापारामध्ये पाय घट्ट रोवलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी आणखी एका क्षेत्रात पदार्पण केलं. आता बाबा रामदेव  कंपन्यांना सुरक्षारक्षक पुरवण्याचंही काम करणार आहेत. यासाठी पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी याची माहिती दिली.  यामुळे देशात 25 ते 50 हजार तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. लवकरच देशातील अग्रगण्य सुरक्षारक्षक पुरवणा-या कंपन्यांमध्ये पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. 'पराक्रम सुरक्षा, आपकी रक्षा" असं ब्रिद त्यांनी ठेवलं आहे.   .