अहमदनगर : शहर भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी शहराची कार्यकारिणी शनिवारी सायंकाळी जाहीर केली. यामध्ये बहुतांश गांधी समर्थकांचा समावेश असून सर्व जाती-धर्मांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे, असे खासदार गांधी यांनी सांगितले.शनिवारी जाहीर केलेली कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष- सुनील रामदासी, हाजी खान अन्वर बशीर, संगीता खरमाळे, दामोदर माखिजा, सरचिटणीस- श्रीकांत साठे, किशोर बोरा, चिटणीस-जगन्नाथ निंबाळकर, बाळासाहेब गायकवाड, अनंत देसाई, किशोर वाकळे, वसंत राठोड, खजिनदार- चेतन जग्गी, प्रसिद्धी प्रमुख-गौतम दीक्षित.महिला आघाडी- गितांजली काळे, युवक मोर्चा- नितीन शेलार, औद्योगिक आघाडी- विश्वनाथ पोंदे. कार्यकारिणी सदस्य- धनंजय जामगावकर, संजय ढोणे, शरद ठुबे, हनुमंत भुतकर, तानाजी कांबळे, विठ्ठल कानवडे, जालिंदर तनपुरे, नरेश चव्हाण. शहर अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या यादीमधील निंबाळकर वगळता सर्वच नावे शहर कार्यकारिणीतून बाद झाले आहेत.
रामदासी, खरमाळे उपाध्यक्ष
By admin | Updated: April 2, 2016 23:58 IST